आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाला जाता दूर येथेच पंढरपूर; विठ्ठल मंदिरे सजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. तद्वतच अकोल्यातील विठ्ठल मंदिरांमध्येही भाविकांची मोठी यात्रा भरते. त्यामुळेच येत्या 9 जुलैला येणार्‍या आषाढी भागवत एकादशी सोहळ्यासाठी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली असून, मंदिरांची रंगरंगोटी, विद्युत रोशणाईसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
300 वर्षे पुरातन जुने शहरातील विठ्ठल मंदिर
जुने शहरातील 310 वर्षांपूर्वीचे र्शी विठ्ठल मंदिर संस्थान अकोलेकरांचे र्शद्धास्थान बनले आहे. मंदिराची स्थापना (कै.) पोपटलाल अग्रवाल यांच्या पूर्वजांनी केली, असे सांगतात. अखंड हरिनाम व विविध उत्सवांना सन 1933 पासून प्रारंभ झाला व आजतागायत सुरूआहे. विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रथम प्रवर्तक तात्यासाहेब देशपांडे होते. जुन्या भारतीय महिला शारदा मंडळाने येथे विविध कार्यक्रम राबवले. विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष वासुकाका ओक यांनी सुरुवातीपासून धार्मिक उत्सवांची परंपरा जपली. त्यांचे नंतर (कै.) नानासाहेब चिने, (कै.) गोविंदराव भौरदकर, एम. एस. जोशी, भगवानदास पटेल, सुरेश अहेर यांनी कारभार पाहिला. आज संस्थेची धुरा अँड. दादासाहेब देशपांडे हे वाहत आहे. या मंदिरात राष्ट्रीय कीर्तनकार (कै.) गोविंदस्वामी आफळेबुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही येथे झाला. नाना महाराजांचे पुत्र बडोदेकर महाराज यांचे प्रवचनही झाले. विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाचे पहिले सर्वसेवाधिकारी (कै.) मांगीलाल शर्मा होते. त्यांचेनंतर 32 वर्षांपासून आमदार गोवर्धन शर्मा हे धुरा सांभाळत आहेत. या मंडळामार्फत वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवले जाते. 1998 पासून आमदार शर्मा व अशोक मनवाणी यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन होत आहे.
81 वा अखंड हरिनाम सप्ताह
आषाढी एकादशीनिमित्त 81 वा अखंड हरिनाम सप्ताह 6 ते 12 जुलैदरम्यान आयोजित केला आहे. या सप्ताहात दररोज सायंकाळी सव्वासहा ते 8 यावेळेत लक्ष्मीनारायण दायमा महाराज यांचे प्रवचन होईल. तर रोज रात्री 9.30 ते 11.30 दरम्यान कीर्तन होईल. यामध्ये 6 जुलैला कीर्तनकार वैष्णवी झामरे, 7 जुलैला अंजली अनवाणे, 8 जुलैला वेदर्शी जकाते, 9 जुलैला डॉ. अभय कुळकर्णी, 10 जुलैला ऋत्विजा देशमुख, 11 जुलैला रेणुका पांडे, 12 व 13 जुलैला डॉ. अभय कुळकर्णी यांचे कीर्तन होईल. अनुजा देशपांडे तबल्यावर संगत करतील.