आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rendering Of Chief Minister Devendra Fadnavis In Nagpur

हिंदीचा विकास करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा- ‘हिंदी ही भाषा साहित्य संस्कृतीपर्यंतच मर्यादित राहता आधुनिक विज्ञानाची जोड देऊन तसेच माहिती तंत्रज्ञानाची भाषा म्हणून हिंदीचा विकास करण्याची आवश्यकता आहे. मातृभाषेमध्ये चिनी भाषेनंतर जगात सर्वाधिक हिंदी भाषा बोलली जात असल्यामुळे हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी नवीन माध्यमांचा प्रभावीपणे वापर व्हावा’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या हिंदी नगर परिसरात आयोजित २५ व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक, समीक्षक डॉ. सूर्यप्रकाश दीक्षित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री डॉ. अनंतराम त्रिपाठी, स्वागताध्यक्ष सूर्यप्रकाश चौधरी, प्रचारमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाला जोडण्याचे काम हिंदी भाषेने केल्यामुळे हिंदीचा प्रसार प्रचार होणे आवश्यक आहे. नागपूर येथे जागतिक हिंदी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळवण्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. सूर्यप्रसाद दीक्षित यांनी हिंदीच्या विकासासोबतच जगात प्रसार प्रचारासाठी सहकार्याचे आवाहन करताना देशाला जोडण्याचे काम सेतू म्हणून हिंदी भाषा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, हिंदीला राष्ट्रभाषेचा सन्मान मिळावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केला. विदर्भात हिंदी भाषेच्या परीक्षेसाठी ६५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, देशात १५ हजार प्रचारक या भाषेच्या विकासासाठी प्रचारासाठी कार्यरत आहेत.

दहावे विश्व हिंदी साहित्य संमेलन नागपूरला आयोजनाचा सन्मान मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन किशोर वासवानी यांनी केले. प्रचारमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी आभार मानले. या वेळी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, सीईआे संजय मीणा, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, डॉ. शिरीश गोडे, माधव कोटस्थाने, या संमेलनाला उपस्थित होते.