आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला येथे विविध उपक्रम राबवून तिरंग्याला मानवंदना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जठारपेठ स्थितबालशिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिनी शालान्त परीक्षा विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रज्ञावान विद्यार्थ्यांकरिता कौतुक सोहळ्याचे आयोजन झाले.

कौतुक सोहळ्यास सतीश सूर्यवंशी, दैनिक दिव्य मराठीचे कार्यकारी संपादक सचिन काटे, शाळेचे अध्यक्ष अविनाश देव, बालशिवाजी प्राथमिक माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना काही समाजव्रतींकडून रोख पारितोषिके दिली जातात. गुणवंतांची संख्या लक्षात घेता शाळा संस्थेचेही भरीव योगदान यामध्ये दिसते. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करा, असे मार्गदर्शन सतीश सूर्यवंशी यांनी केले, तर सचिन काटे यांनी गुणवंतांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी असेच प्रयत्न करून यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव यांनी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून देशाच्या प्रगतीस कसा हातभार लावता येईल, हे गोष्टीरूपात सांगितले. कार्यक्रमास शाळा समिती सदस्य, पालकवर्ग, शिक्षक कर्मचारीवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी कुळकर्णी यांनी केले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
अकोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. या वेळी अजय तापडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सै. युसूफ अली, दिलीप आसरे, प्रा. सरफराज, पापाचंद्र पवार, आनंद बलोदे, फजलू पहिलवान, प्रा. शौकतअली शौकत, अल्पसंख्याक युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काजी अतिकोद्दीन, प्रवीण निमकर, रमेश खंडेलवाल, निसारभाई खान, मधुकर सावळे, सुधाकर नारे, संदीप तायडे, राजेश गजभिये, सविता गायकवाड, ज्योती जामनिक, शीतल बनसोड, सारिका खंडारे, सूरज दामोदर आदी उपस्थित होते.

अकोला शहरातील शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनेच्या वतीने ६६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासून विविध परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. विविध घोषणांनी शहर दणाणले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर भाषण, लेझीमचे सादरीकरण झाले. तसेच स्वच्छता अभियान, रॅली, रक्तदान शिबिरे यासह विविध उपक्रमही राबवण्यात आले. या वेळी "गणराज्य दिन चिरायू होवो..!'असा नारा देण्यात आला. तसेच ‘बेटी बचाव’ चा संदेश महाविद्यालयांनी काढलेल्या प्रभातफेरीतून दिला. यामध्ये परिचारिका कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आरोग्याचा संदेश दिला.
अकोला येथील डी. आर. पाटील विद्यालयातील क्रीडा शिक्षक अशोक नांदुरकार यांच्या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिन सोहळ्यात २६ जानेवारीला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी शास्त्री क्रीडांगणावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कवायतींचे आयोजन झाले. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरण नियोजनबद्धतेसाठी अशोक नांदुरकार यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.