आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वज सन्मान अभियान; सरसावल्या शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दैनिक दिव्य मराठीच्या राष्ट्रध्वज सन्मान अभियानास शहरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळांनी राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शुक्रवारी (दि.24) या शाळा विद्यार्थ्यांना तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ देणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या अभियानामुळे राष्ट्रभक्ती वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. येत्या शुक्रवारी (दि.24) आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची शपथ देण्याची तयारी दर्शवून आज अनेक शाळा दिव्य मराठी राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी झाल्या. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजाची विक्री होते. यानंतर मात्र राष्ट्राच्या सन्मानाचे प्रतीक असणारा आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या तिरंग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा अपमान टाळण्यासाठी आणि राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचे मुख्य केंद्र असलेल्या शाळांनी आता राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रध्वजाची गरिमा राखा : प्रा. किशोर बुटोले
अनेकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. या तिरंग्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. त्या आपल्या राष्ट्रध्वजाची गरिमा प्रत्येकाने जपली पाहिजे. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीमार्फत राबवण्यात येणारे राष्ट्रध्वज सन्मान अभियान निश्चितच स्तुत्य आहे. त्याला प्रत्येकाने भरभरून प्रतिसाद द्यावा. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरूच नयेत आणि राष्ट्रध्वज अंकित असलेली कुठलीही वस्तू सन्मानाने जपावी. लहान आकारातील खिशाला लावण्यात येणारे राष्ट्रध्वज इकडे-तिकडे पडणार नाहीत, याची काळजी


सहभागासाठी साधा संपर्क
या अभियानाच्या माध्यमातून मुलांमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम ठेवण्यास मोलाची मदत होणार आहे. या अभियानात उद्या शहरातील अनेक शाळा सहभागी होणार आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठी शाळा मुख्याध्यापकांनी 8390043174, 8390042939, 8390045473 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशप्रेम वृद्धिंगत होण्यास मदत
आपले राष्ट्रगीत जन गण मन हे जगात पहिल्या नंबरचे राष्ट्रीय गान झाले आहे. याची जाणीवही चिमुकल्यांना असावी आणि त्यांच्यातील देशभक्ती दिवसंदिवस वृद्धिंगत होण्यासाठी त्यांना आपले राष्ट्रीय गान, आपला राष्ट्रीय ध्वज तसेच जगातील ज्या आपल्या गोष्टी आहेत त्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण होण्यासाठी या अभियानाचा निश्चितच उपयोग होईल. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. दैनिक दिव्य मराठीच्या या अभियानाला माझ्या मनापासून शुभेच्छा. डॉ. आशा मिरगे, सदस्य, राज्य महिला आयोग.

अलीकडे लहान आकारातील प्रतीकात्मक राष्ट्रध्वज कागदी, प्लास्टिक स्वरूपात 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्वत्र दिसून येतात. शाळकरी विद्यार्थी त्या दिवसानिमित्त हौसेने ते खिशाला, आपल्या सायकलीला लावून मिरवतात. मात्र, असे करताना आपल्या देशाची आन, बान आणि शान असलेल्या तिरंग्याचा अवमान तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तसेच कुणाकडून नकळत असा अवमान होत असेल तर त्याला वेळीच रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दैनिक दिव्य मराठीच्या राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने तशी शपथच घ्यावी. डॉ. शांताराम बुटे, प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय

अभियानात सहभागी झालेल्या शाळा : माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, डीएव्ही इंग्लिश स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स, नोएल स्कूल, हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, निशू नर्सरी आणि कोठारी कॉन्व्हेंट, ब्राrाण सभा, एमरॉल्ड हायस्कूल, फुलपाखरू शाळा, आरडीजी पब्लिक स्कूल, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, मनुताई कन्या शाळा, महापालिका हिंदी शाळा, एस.आर.ए. इंग्लिश स्कूल, यु. आर. इंग्लिश प्रायमरी स्कूल, आदर्श इंग्लिश स्कूल, सरस्वती शिशू मंदिर, खंडेलवाल इंग्लिश स्कूल, खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा, प्रभात डे बोर्डिंग स्कूल, प्रभात स्कूल मुख्य शाखा, रामकृष्ण किड्स, आदर्श विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू ईरा हायस्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, प्राजक्ता विद्यालय, ज्ञानदर्पण पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळा, सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, डी.आर.पाटील माध्यमिक शाळा, बी.आर.हायस्कूल आदी.

मराठी अभिनेत्री शीतल पाठक यांचे आवाहन : अलीकडे काहीजण राष्ट्रध्वज घरात किंवा कार्यालयात लावतात, हे चुकीचे आहे. तिरंगा घर किंवा कार्यालयात नव्हे, तर हृदयात जपला पाहिजे, असे आवाहन मराठी चित्रपट ‘काकस्पर्श’मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणार्‍या अभिनेत्री शीतल पाठक यांनी केले. दैनिक दिव्य मराठीतर्फे राबवण्यात येणार्‍या राष्ट्रध्वज सन्मान अभियानाचे कौतुक करून त्यांनी हे आवाहन केले. ‘चेहरा’ या नवीन चित्रपट प्रदर्शनानिमित्त त्या अकोल्यात आल्या असता, त्या बोलत होत्या. शीतल पाठक यांनी डझनभर मराठी चित्रपटांसह वृदावन, तुझा गळा माझा गळा, पंचनामा यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून भूमिका वठवल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या, विद्यार्थीच नव्हे, तर अनेकदा मोठय़ा व्यक्तींकडूनही राष्ट्रध्वजाचा कळत-नकळत अवमान होतो. हे टाळले पाहिजे. राष्ट्रध्वज आपली आन, बान आणि शान आहे. त्याचा अवमान होता कामा नये, प्रत्येकाने राष्ट्रध्वजाला हृदयात जपावे, त्याचे प्रदर्शन करू नये, असेही त्या म्हणाल्या.