आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation News In Marathi, Maratha Community Demand Maratha Reservation Issue At Akola

आरक्षण लढय़ासाठी मराठा महासंघ ठाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी त्याकाळी सुरू केलेली मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना राणे समितीने दिलेला मराठा आरक्षणाचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडला असल्याने समाज संभ्रमावस्थेत आहे. पुणे येथे राज्यातील मराठा संघटनांच्या बैठकीत आगामी लढय़ाविषयी चर्चा झाली. निर्णायक लढय़ासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ ठाम आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष विनायकराव पवार यांनी केले. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष (कै.) अण्णासाहेब पाटील यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लढय़ाची भूमिका मांडली.
गोरक्षण रोडस्थित इन्कम टॅक्स चौकातील मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यालयात मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष (कै.) अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन केले. या वेळी प्रा. प्रतिभा जानोळकर, ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चोपडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुमन कराळे, सुभाष शिंदे यांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा संघटक योगेश थोरात, कार्याध्यक्ष दत्ता पाकधुणे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्ता ढोरे, र्शीकांत फाले, सुरेश ठाकरे, संदीप भुंबरे, श्याम वाफदाने, वैभव चर्‍हाटे, तुषार निकम, ललित राजगुरू, अमोल सूर्यवंशी, पवन उगले, सागर अरज, अक्षय हिंगणे, नाना खैरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष विठ्ठल गाढे यांनी केले. सुमन कराळे यांनी आभार मानले.