आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank's Decision To The Citizens Of Confusion

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने नागरिकांत संभ्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-एक जुलैपासून 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून परत घेऊन त्या बदलून मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट करूनही नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही लोकांनी बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, योग्य वेळी नोटा बदलण्याबाबत सूचना लावली जाईल. लोकांनी बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन बँकांनी केले आह़े
2005 पूर्वीच्या नोटा चलनातून परत घेतल्या जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने बुधवारी स्पष्ट केले. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2014 पासून लोकांनी या चलनी नोटा बँकांकडून बदलून घेण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.
प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत तशी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेचे आदेश स्पष्ट असूनही सामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने काही बँकांच्या शाखांमध्ये लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी केली होती तसेच काहीजणांनी याबाबत चौकशी केली.
शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या अनेक शाखा आहेत़ मात्र, अद्यापपर्यंत नोटा बदलून देण्याबाबत बँकांना कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे नोटा आता बदलून देता येणार नाहीत़ त्याबाबत सूचना लावली जाईल, असे बँकेतील अधिकार्‍यांनी सांगितले. लोकांनी घाबरून जाऊ नये. नोटा बदलून मिळण्यास अजून बराच वेळ आहे. नोटा बदलून मिळतील, शाखेमध्ये तशा सूचना लावल्या जातील़ त्यामुळे बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.
स्वतंत्र काउंटर केव्हा सुरू होणार ?
सन 2005 पूर्वी छापलेल्या नोटा चलनातून परत घेण्यात येत असल्याने बँकांशी संपर्क करून नागरिकांना या नोटा बदलून घ्याव्या, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. ज्या नोटांवर छपाईचे वर्ष नमूद नसेल त्या नोटा परत कराव्या लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांना नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावे लागणार आहे. हे काउंटर केव्हा सुरू होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.