आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सिलिंडर, रेशनसाठी नागरिकांच्या लांब रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सध्याकाळाबरोबर चालण्यासाठी स्पर्धा सुरू असताना नागरिकांना मात्र शहरात रोजच्या जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रॉकेल, गॅस सिलिंडरसह
रेशन कार्ड मिळवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शहरात २३ गॅस एजन्सी असून, जिल्ह्यात लाख ४३ हजार ५०४ ग्राहक आहेत. शहरातील कित्येक गॅस एजन्सींवर सकाळी वाजेपासून नागरिकांना नंबर लावावा लागतो.
ऑनलाइन बुकिंग करूनसुद्धा अनेकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही. तक्रार केली की एजन्सीधारक काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे ग्राहकांना जादा
पैसे घेऊन सिलिंडरविकत घ्यावे लागते. अनेकदा ग्राहक पुरवठा विभागात तक्रारही करतो. मात्र, त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पुरवठा अधिका-यांजवळ वेळ नसतो.

गॅस एजन्सीधारकाकडून सर्वसामान्य ग्राहकांची अडवणूक केली जाते. सिलिंडर मिळवण्यासाठी १० ते १५दिवस लागतात.
यावर करू शकतो आपण सिलिंडरबाबत तक्रार
*सारांशसाहू *आय.ओ.सी. *९४२२८०४६५४
*लोकेश सक्सेना * एच.पी. *९९२३७७२७७६
*प्रीती मिश्रीकोटकर *भारत पेट्रोलियम *९४२२३३७४९६
गॅस सिलिंडरधारक
एकगॅस सिलिंडरधारक १,७१,०८६
दोनगॅस सिलिंडरधारक ७२,४१८
एकूण२,४३,५०४