आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी नागरिकांचे स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मे महिना संपत आला, तरी पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत. पाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक "स्थलांतर' करायला लागले असल्याचे दिसून येते, तरीसुद्धा गटविकास अधिकारी तहसीलदारांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी कुठलाही समन्वय दिसून येत नाही.

जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा िवभागाने तयार केलेल्या एप्रिल ते जून २०१५ दरम्यानच्या पाणीटंचाई उपाययोजनांच्या कृती आराखड्यानुसार १५९ गावांत पाणीटंचाईच्या २५८ प्रकारच्या उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीटंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली आहे. पाणीटंचाईच्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, सूचनांकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येते. पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महसूल प्रशासन पंचायत समिती प्रशासन, अशा तीन यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, असे गृहीत धरून कृती आराखडा तयार करण्यात आला. तहसीलदारांना शासनानेच टँकर सुरू करण्याचे अधिकार प्रदान केले. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये तात्पुरत्या, पण तातडीने पाण्याची सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी टँकरची आवश्यकता असलेल्या गावांची यादी तयार करून तहसीलदारांकडे पाठवायची आहे. दीड महिन्यापूर्वीच शासनाने हे आदेश दिले असतानाही अद्याप एकाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. गावात पाणीटंचाई असल्याने अकोट तालुक्यातील रोहणखेड, तराेडा, कावसा, वडाळी सटवई या गावांतील नागरिकांनी गाव सोडण्यास सुरुवात केली आहे.

गावे योजना
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष : गावातपाणीटंचाईचे सावट असताना पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह संबंधित मतदारसंघाच्या आमदारांचे कानाडोळा केला आहे.
ग्रामसेवक वैतागले : एकीकडेग्रामसेवकांचा संप सुरू आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्याकडे गावातील पाणीटंचाईची स्थिती माहिती कोण कळवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामे थांबली अाहे.
समन्वय नाही: गटविकासअधिकारी तहसीलदारांमध्ये समन्वय नसल्याने पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. गटविकास अधिकारी तहसीलदारांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज अाहे.
अंमलबजावणी केव्हा? : पाणीटंचाईकृती आराखडा मंजूर आहे. त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले दिसून येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

>विंधन विहिरी ९९ ८६
>नळ योजना विशेष दुरुस्ती ४८ ४५
>विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती
>तात्पुरत्या नळ योजना ७३ ९२
>प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करणे
>बैलगाडीने पाणीपुरवठा ३३ ३२
>बुडक्या घेणे १९
बातम्या आणखी आहेत...