आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महसूल अधिका-याकडून मतदान केंद्रांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभानिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, सहा मतदारसंघात असलेल्या विविध मतदान केंद्रांची पाहणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १,७७४ मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात जवळपास ३५ हजार मतदार वाढले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत १६ लाख ७४ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात १३१ संवेदनशील मतदान केंद्रे २७ अति संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त महापालिका यांना प्रशासनामार्फत सूचित करण्यात आले आहे.
आचारसंहितेचीप्रतीक्षा: उमेदवारांसहमतदारांनाही आचारसंहिता लागण्याची प्रतीक्षा लागलेली िदसून येत आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवडणूक विभागाचे उपजिल्हािधकारी उदय राजपूत यांच्या मार्गदर्शनात अकोला विभागात निवडणूक पूर्वतयारीला सुरुवात झालेली दिसून येत आहे. मतमोजणी केंद्राची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे.