आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Collection From Illegal Water Pipeline Connection In Akola

अवैध नळजोडणीतून दोन लाख रुपयांचा महसूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अवैध नळजोडणी शोध पथकाने मागील दोन दिवसांत ५० अवैध नळजोडण्या वैध करून दोन लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.

अवैध नळजोडण्या वैध करण्याची मोठी मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. या मोहिमेमुळे अवैध नळ, वैध होत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळत आहे. अवैध नळजोडणी वैध करण्याची मोहीम दोन प्रकारे सुरू आहे. एक पथक थेट शहरात फिरून अवैध नळजोडणी शोधून वैध करत आहे, तर मालमत्ता कर विभागात अवैध नळजोडणी वैध करण्यासाठी काउंटर सुरू करण्यात आले आहे. या दोन्हीच्या माध्यमातून महापालिकेला एकीकडे लाखो रुपयांचा महसूल तर दुसरीकडे अवैध नळजोडण्या वैध करून त्याची नोंद घेतल्या जात आहे.

मनपाच्या मालमत्ता कर विभागात आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या जोडण्या वैध करून घेतल्या, तर सहाशे ते सातशे नागरिकांच्या अवैध नळजोडण्या पथकाने वैध केल्या. या मोहिमेत आतापर्यंत महापालिकेला अंदाजे पाऊण कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. शहरात एकही नळजोडणी अवैध राहू नये, असा निश्चय प्रशासनाने केला आहे. त्यामुळेच ही मोहीम शहराच्या सर्व भागांत राबवली जात आहे. त्यामुळेच सुटीच्या दिवशीही ही मोहीम राबवली जात आहे. दसऱ्याला सुटी असतानाही कर्मचाऱ्यांनी मध्य झोनमध्ये अवैध नळजोडणी मोहीम राबवली. सलग दोन दिवस चालवलेल्या या मोहिमेत महापालिकेला दोन लाख रुपयांचा महसूल मिळाला. ही मोहीम नीरज ठाकूर, सुनील चव्हाण, इलियास खान आदींनी राबवली.