आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - जिल्हय़ातील संभाव्य पाणीटंचाईचा सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला असून, सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी तो जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्याकडे मंजुरीस्तव सादर करण्यात आला आहे.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे जिल्हय़ात पाणीटंचाई मार्चनंतर जाणवण्यास सुरुवात होते. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक भटकंती करताना दिसतात. जिल्हय़ात प्रामुख्याने बार्शिटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. गेल्या वर्षीसुद्धा प्रशासनाने आधीच नियोजन केल्याने पाणीटंचाईसाठी नागरिकांकडून ओरड झाली नाही.
या वर्षीसुद्धा पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासन कामाला लागलेले दिसून आले. सुरुवातीला प्राथमिक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये आवश्यक ते बदल केल्यानंतर नव्याने 10 फेब्रुवारीला जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण करणे, टॅंकरने पाणीपुरवठा करणे, नळयोजना विशेष दुरुस्ती, कूपनलिका निर्मितीचे काम केले जाणार आहेत. जिल्हय़ातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला भटकंती करावी लागणार नाही, याची काळजी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत घेतली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नियोजनबद्ध कृती आराखडा
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजुरीस्तव जिल्हाधिकार्यांकडे पाठवला आहे. जिल्हय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील राहील. वसंत सरकटे, कार्यकारी अभियंता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.