आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राईट टू रिजेक्ट’बाबत मतदार अद्याप अनभिज्ञच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्य निवडणूक आयोगाने प्रथमच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राईट टू रिजेक्टचा पर्याय मतदारांना दिला आहे, परंतु याबाबत जिल्हा आणि तहसील प्रशासनाच्या निवडणूक विभागाने प्रचार केला नाही. त्यामुळे उमेदवारांच्या संदर्भात नकारार्थी बटण कसे वापरायचे, याची माहिती काही मतदारांना नसल्याचे तालुक्यातील अनेक केंद्रांवर दिसले.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे 53 गट आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी रविवारी घेतलेल्या निवडणूकीत जिल्ह्यातील एकूण एक हजार 888 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभागाने या निवडणुकीत राईट टू रिजेक्ट या बटणाचा पर्याय मतदारांना दिला आहे. परंतू, निवडणूक विभागाने राईट टू रिजेक्टबाबत प्रचार व प्रसार केला नाही. परिणामी, मतदारसुद्धा नकारार्थी बटणासंदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. मतदारांनी याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.
नकाराधिकार म्हणजे काय?
निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदाराला जर उमेदवार योग्य वाटत नसेल तर राईट टू रिजेक्ट हे बटण वापरण्याचा योग्य पर्याय दिला आहे. या निवडणुकीत किती मतदारांनी राईट टू रिजेक्ट या बटणाचा वापर केला हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.
जनजागृती आवश्यक
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक विभागाने राईट टू रिजेक्टबाबत पर्यायी बटण वापरण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात प्रशासनाने जनजागृती केली नाही. त्यामुळे संबंधित प्रकाराबाबत काहीही माहिती नाही.
- जुबेर खान, मतदार
मतदार संभ्रमात
निवडणुकीत राईट टू रिजेक्टचा पर्याय राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. मात्र, याबाबत अनेक मतदारांना काहीही कल्पना नाही. प्रशासनाने यासंदर्भात माहिती देणे अपेक्षित होते, परंतु तसे केले नाही.
- नरेंद्र पोटेकर, मतदार