आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील बांधकाम साहित्य केले जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-म्हाडा वसाहतीत नव्याने निर्माण होणार्‍या बांधकामामुळे नाल्या व रस्ता ब्लॉक झाल्याने याविरोधात महापालिका प्रशासनाने 29 जानेवारीला कारवाई केली. येथे रस्त्यावर ठेवलेले पाच टन लोखंड व बांधकाम साहित्य जप्त केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दिली. भाजप नगरसेवक अजय शर्मा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
म्हाडा कॉलनीत नाल्या व रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने त्याचा त्रास रामनगरसह त्या भागातील नागरिकांना होतो. या भागातील नाल्या तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील लोखंड व इतर साहित्य महापालिका प्रशासनाने जप्त केले. या ठिकाणी म्हाडाच्या अधिकार्‍यांनी रस्ता, नाल्याची सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी याबाबत आमदार गोवर्धन शर्मा यांची भेट घेत सुविधा देण्याची मागणी केली होती. या वेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना विचारणा करत त्यांना म्हाडा कॉलनीत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. म्हाडाच्या अधिकार्‍यांनी कॉलनीत रस्ते व नाल्यांची सुविधा देण्यास मान्यता दिली. म्हाडा अधिकार्‍यांनी निर्माणाधीन काम पूर्ण झाल्यावर रस्ते होतील, असे स्पष्ट केले. नाल्यांचे बांधकाम करण्याचे लेखी आश्वासन दिले. मनपाने 15 दिवसांपूर्वी दिलेल्या नोटीसकडे म्हाडाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाईत मनपाचे संदीप गावंडे, विष्णू डोंगरे यांचा सहभाग होता.
‘फिप्टी-फिप्टी’ :
गोरक्षणरोडवरील अनधिकृत बांधकामाचा नकाशा मंजूर करणार्‍या एका नगरसेवकाला 50 हजारांपैकी 25 हजार प्राप्त झाल्याची माहिती आहे. या नगरसेवकाने मुंबई दौर्‍यासाठी पदाधिकार्‍यांवर पैसा खर्च केला. बांधकामाची फाइल मुन्नाबाबा यांनीच मंजूर केल्याने या नगरसेवकाची अडचण झाली. बुधवारी लोकांनी वर्गणी जमा करत 25 हजार देऊन हे प्रकरण तूर्त शांत केले. या प्रकरणात मनपाच्या एका पदाधिकार्‍याची फसवणूक झाल्याची माहिती आहे.
महापालिकेचा फायदा :
या कारवाईमुळे महापालिकेला या भागात विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून या भागातील रस्ते व नाल्यांची निर्मिती होणार आहे. यासाठी म्हाडा पैसे खर्च करणार असून, महापालिकेला या भागातील मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी द्यावा लागणार नाही. या कारवाईतून नगरसेवकाचा फायदा झाला नसला तरी, महापालिकेला तयार रस्ते व नाल्या प्राप्त होणार आहेत.