आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबराच्या ‘सड्या’पूर्वी तपासणार ‘स्काडा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरात रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर सहा महिन्यात रस्ता होताचा नव्हता होत होता. हा खर्च पाण्यात जात असल्याने शासनाने भारतीय रस्ते महासभेद्वारे रस्त्यावर डांबराचा सडा पडण्यापूर्वी स्काडा प्रणालीतून तो आला का, याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.
ती प्रणाली लावूनच 75 लाखावरील विकासकामे करावी. तसेच त्याखालील किमतीच्या रस्त्याचा विकास करताना ड्रममिक्स प्लँट व स्काडा प्रणाली लावलेले तापमानावर लक्ष ठेवणारे रोलर लावावे लागणार आहे. 75 लाखांवरील रस्त्याची निर्मिती करताना अद्ययावत बँचमिक्स प्लँट, इटेलिजंट कॉम्पॅक्टर, प्लॅन्टवर तसेच साइटवर स्काडा (सुपरव्हाझरी कंट्रोल अँड डाटा एक्वॉझिशन) प्रणाली तंत्रज्ञानाचा विचार करून एकसूत्रता आणावी लागणार आहे. भारतीय रस्ते महासभेद्वारा रस्त्याची भौमितिक प्रमाणके व विनिर्देशांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार आता रस्ते तयार करावे लागतील.
रस्त्याची तपासणी करावी लागेल
रस्त्यावरील वाहतूक, वर्दळ, पर्जन्यमान, कामाचे स्वरूप, नवीन बांधकाम, रुंदीकरण, मजबुतीकरण, नूतनीकरण, रस्त्याची अस्तित्वातील पृष्ठभागाची स्थिती इत्यादी घटकांचा विचार करून रस्त्यावर काय ट्रिटमेंट द्यावी, याचा विचार करण्यात येईल. रस्त्याचे डांबरीकरण करताना भारतीय रस्ते महासभेद्वारा सूचित निर्देशानुसार काम करावे लागणार आहे.