आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अखेर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू, महापालिका क्षेत्रातील १८ पैकी ११ रस्त्यांना प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - मनपाक्षेत्रातील १८ पैकी ११ रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला आहे. १२ रस्त्यांचे डांबरीकरण तर सहा रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे.

शहरातील बोटावर मोजण्याइतके रस्ते वगळता इतर सर्व प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली होती. २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची वाट लागली होती. महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे शहरातील १८ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मागितला होता. राज्य शासनाने १८ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतु, या निधीत महापालिकेला स्वत:चा तेवढाच हिस्सा टाकण्याची अट घातली होती. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही बाब शक्य नव्हती. त्यामुळे अनेक दिवस निधी प्राप्त होऊनही रस्त्यांच्या कामाबाबत प्रशासनाला पाऊल उचलता आले नाही. परंतु, पुढे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही अट शिथिल केली. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. १८ पैकी १२ रस्त्यांचे डांबरीकरण तर सहा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी निविदा बोलावण्यात आल्या. परंतु, रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे, या हेतूने प्रशासनाने रस्ता दुरुस्तीच्या कामात पीएमसी नियुक्त केली. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या कामातील बारीकसारीक तांत्रिक बाबी पीएमसी यांनी कंत्राटदारांकडून करून घेतल्या. परिणामी, आता सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात डांबरीकरण केले जाणार असून, मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ११ रस्त्यांचा कायापालट होणार आहे.मीटर कामात प्रथमच प्रथमच रस्त्याची रुंदी वाढणार.

कामावर पीएमसीची बारीक नजर
रस्त्याचेकाम निकषानुसार तसेच दर्जेदार होत आहे की नाही? यासाठी पीएमसी बारीक नजर ठेवून आहे. त्यामुळे कंत्राटदाराला कुठेही काम करताना हात आखडता घेता येणार नसून, शहरात प्रथमच दर्जेदार रस्ते नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.

पाच-पाच मीटर घेतली लेव्हल
दुरुस्तीच्याकामापूर्वी प्रत्येक रस्त्याची समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार प्रत्येक पाच मीटरवर लेव्हल घेण्यात आली. त्यामुळेच या वेळी केवळ डांबरावर डांबर अंथरूण रस्त्याचे काम होणार नसून लेव्हलनुसार रस्त्याचे खोदकामही केले जात आहे.

डांबरीकरणामुळे रस्त्यांची रुंदी वाढणार
यापूर्वीडांबरीकरणाचे काम करताना कोणतेही निकष पाळले जात नव्हते. परंतु, या वेळी १६ कोटी रस्ते प्रकल्पाच्या धर्तीवर सर्व निकष पाळले जाणार आहेत. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामात प्रथमच रस्त्याची रुंदी वाढणार आहे.

रस्त्यावरील फलकही काढले
रस्त्यांचीरूंदी वाढवण्यासाठी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फलक, बोर्डही काढण्यात आले. फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापर्यंत शहरातील ११ रस्त्यांचा कायापालट होणार आहे.

आठ किलोमीटरचे रस्ते होणार
११रस्त्यांचे काम तूर्तास सुरू झाले आहे तर सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या निविदा प्रशासनाने बोलावल्या आहेत. १२ रस्त्यांची एकूण लांबी ७,८१० मीटर असल्याने शहरात एकूण आठ किलोमीटरचे रस्ते चकाचक होणार आहेत.