अकोला- शहरातील वृंदावननगरात चोरांनी घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार, 2 मे रोजी उघडकीस आली.
याबाबत सिद्धेश्वर महादेव दलाल यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ‘वृंदावननगरात त्यांचे घर आहे. ते आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून मंगळसूत्र, अंगठी, गोफ, सोने आणि चांदीचे शिक्के व नगदी 14 हजार असा एकूण दीड लाखांचा ऐवज लंपास केला.’ या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.