आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलानगरात दिवसा लाखाची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खदान पोलिस ठाण्यांतर्गत गोरक्षणमधील कपिलानगरमध्ये गुरुवारी भरदुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान घरी कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री 10 वाजेपर्यंत या घटनेबाबत खदान पोलिस ठाण्यात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली नव्हती.
प्रांजल नरेंद्र पुरोहित (44) या कपिलानगरमध्ये राहतात. त्या त्यांचे कुटुंबीयांसह गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी याचवेळी घराच्या खिडकीच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. दोन आलमारी फोडून त्यातील नगदी 40 हजार रुपये, 26.70 ग्रॅम सोने, असा एकूण 1 लाख 12 हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. चोरीची घटना दुपारी घडूनही खदान पोलिस ठाण्यात रात्री 10 वाजेपर्यंत घटनेची माहिती नव्हती. याबाबत पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता कुणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.