आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery Issue At Telhara, Police Catch Thief, Divya Marath

तेल्हारा शहरातील दरोड्याच्या प्रयत्नातील 14 जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल्हारा- दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हार्‍यातील सराफ लाइनमध्ये काही व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी हिवरखेड रस्त्याने येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घोडगाव टी-पॉइंट येथे नाकाबंदी केली.

यादरम्यान एमएच 30 एएफ 2911 आणि एमएच 30 एएफ 4721 क्रमांकाच्या पांढर्‍या महिंद्रा मॅक्झिमो या दोन गाड्यांमध्ये एकंदर 16 जण आढळून आले. त्यांच्याजवळ पाच लोखंडी गज, बांबू, आडजातच्या काठय़ा आणि साखळदंड आढळून आला. या वेळी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या 14 आरोपींमध्ये विजय पांडुरंग पोहरकार, सिद्धार्थ बंडू खंडारे दोघेही रा. अकोट, कुलदीप रामेश्वर भोजने रा. भांबेरी, ब्रिजलाल उत्तम गवई रा. मालठाणा, सुमेध मधुकर थोरात, रा. गोर्धा, अजय बाबुलाल सरदार, रोषण नीळकंठ मेर्शाम, श्याम र्शीकृष्ण सोळंके, बाळकृष्ण किसन पवार, रमेश रामचंद्र सोळंके, धम्मपाल अशोक तायडे, हर्षकुमार भास्कर सरदार सर्व रा. चित्तलवाडी, अरविंद प्रल्हाद इंगळे, प्रवीण प्रल्हाद इंगळे दोघेही रा. मिलिंदनगर, तेल्हारा या 14 जणांविरुद्ध पोलिसांनी भादंवि 399, 402 अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक आठवले यांनी तक्रार नोंदवली आहे. ही कारवाई ठाणेदार आनंद निकम यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक अशोक बायस्कर, पाचपोर, हेडकॉन्स्टेबल किशोर आठवले, हवालदार देशमुख, सोळंके, कॉन्स्टेबल चंदू सोळंके, वसंत खैरे यांनी केली.