आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडेलवाल यांचे सराफा दुकान फोडून सहा किलो चांदी लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जयहिंद चौकात असलेले खंडेलवाल यांचे सराफा दुकान चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री फोडले. दुकानातून सहा किलो ३०० ग्रॅम चांदी चोरून नेली. विशेष म्हणजे चोरट्यांनी दारू ढोसून चोरी केल्याचे दारूच्या शिश्यांवरून दिसून आले. याप्रकरणी मंगळवारी सकाळी डॉग स्‍कॉडला पाचारण करण्यात आले होते.

गोपाल रामेश्वर खंडेलवाल यांचे जय हिंद चौकात सराफा दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री दुकानाच्या छताला चोरट्यांनी छिद्र पाडले. दुकानामध्ये ठेवलेल्या चांदीवर त्यांनी हात साफ केला. या वेळी त्यांनी चांदीच्या पाटल्या किलो, चांदीचे जोडवे किलो, तोरड्या किलो, मनगट्या आणि बिचवे किलो, अंगठ्या २०० नग आणि चांदीचे करदोडे किलो सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या बेसर असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे जुने शहर पोलिसांना सूचना देण्यात आली. या वेळी शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस निरीक्षक रियाज शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद काळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान,श्वानानेदुकानाच्या मागच्या दिशेने असलेल्या गल्लीमध्ये माग काढला. त्यामुळे चोरटा दुकानाच्या मागच्या दिशेने येऊन तो दुकानावर चढला असण्याची शक्यता आहे.
तपासणी करताना पोलिस अधिकारी.

चोरटे सराईत नसावेत
-चोरीकरणारे हे सराईत नसावेत. कारण या दुकानाच्या छतावर दारूच्या शिश्या आढळून आल्या. तसेच लॉकरमध्ये जे दागिने ठेवण्यात आले होते, ते तसेच आहेत. त्यांना जे दिसले, तेच दागिने त्यांनी पळवले. सीसीटीव्ही फुटेजवरून आम्ही तपास करत आहोत.''- रियाजशेख ,पोलिस निरीक्षक.

पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांनीजय हिंद चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले. या वेळी या फुटेजमध्ये रात्रभर रिलायन्सचे कर्मचारी काम करताना दिसून आले. मात्र, चोरटे मागच्या दिशेने पळून गेल्यामुळे ते या फुटेजमध्ये दिसत नसल्याची माहिती आहे.