आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत भारिपचे आंदोलन, महापौरांना वगळले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- माझा पक्ष, माझी सत्ता, असा नारा देणार्‍या भारिप बहुजन महासंघाला आज महापालिकेत स्वपक्षाच्या सत्तेविरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आयुक्त दीपक चौधरी यांना शहरातील पंधरा समस्यांच्या मुद्दय़ावर एक तास घेराव घातला. महापालिकेच्या रेल्वेस्थानकस्थित उत्तर झोन कार्यालयात घेराव घालत निवेदन दिले. या आंदोलनात महापौर ज्योत्स्ना गवई व त्यांचे पती गौतम गवई यांची अनुपस्थिती होती, तर जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळे या वेळी आवर्जून उपस्थित होत्या, हे विशेष.

या निवेदनाच्या आंदोलनानंतर भारिप-बमसं हे ठिय्या आंदोलन करणार आहे. त्यानंतर जनतेच्या समस्या सुटल्या नाही तर भारिप-बमसं स्टाइल आंदोलनाचा इशारा या वेळी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व भारिप-बमसंचे समन्वयक प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले. या आंदोलनात दिनकर वाघ, विजय चक्रे, श्रीकांत ढगेकर, विजय मेर्शाम, किशोर मानवटकर, वंदना वासनिक, संदेश तायडेंचा सहभाग होता.

कान-नाक-डोळे बंद
महापालिका प्रशासनाचे कान, नाक व डोळे बंद आहे. आयुक्तांच्या गोलमाल उत्तराने जनतेला त्रास होत असल्याचा आरोप नगरसेवक गजानन गवई यांनी केला. आयुक्त फॉलोअप घेण्यात मागे पडल्याचे ते म्हणाले.

विरोधकांना फटका
सत्तारूढ पक्षाने आंदोलन केल्याने आज विरोधी पक्षाला फटका बसला. विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेर्शाम यांनी भाजप नगरसेवक अजय शर्मा व उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांच्यातील वाद व शहरातील साफसफाई याविषयी माहिती जाणून घेण्यास उपायुक्तांना बोलावले होते. पण, भारिप बमसंच्या आंदोलनामुळे उपायुक्त विरोधी पक्षनेत्यांनी बोलावल्यानंतर पोहचले नाहीत. त्यामुळे विरोधकदेखील संतप्त झाले होते.

भारिप-बमसंच्या नेत्यांची मागणी
> सन्मानाची वागणूक देण्यात येते, पुढे ही देऊ.
> 22 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा
> कचरा सोमवारपर्यंत उचलू, टनाप्रमाणे कचर्‍यासाठी महासभेची मंजुरी घ्यावी.
> शहरातील सुमारे 70 टक्के पथदिवे सुरू आहेत, इतर पथदिवे लवकरच सुरू होतील.
> प्रस्ताव तयार करण्याची अधिकार्‍यांना सूचना.
> अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियमित महापालिका कार्यालयात बसावे.
> देयक काढण्यात येत असल्यास चौकशी करू.
> कुठेही मोठे लिकेज नाही, वरिष्ठांनी चौकशी करावी.
> अवैध बांधकामे थांबवणार, र्शेत्रीय अधिकार्‍यांकडे तक्रार करा. खंडणी बहाद्दरांवर फौजदारी
> फॉगिंग मशीन सुरु करुन फवारणी करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्यात येईल.
> सर्व नगरसेवकांना सन्मान द्यावा.
> नियमित व किमान एक दिवसाआड पाणी द्यावे.
> शहरातील कचरा उचलावा, कचर्‍याचे कंत्राट टनाप्रमाणे देण्यात यावे.
> पथदिवे नियमित सुरू राहावे, त्याचे बनावट देयक थांबवण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा.
> दलित वस्तीच्या कामाचे नियोजन करा.
> कार्यालयात आयुक्तांनी व कर्मचार्‍यांनी नियमित उपस्थित राहावे.
> 2001 ते 2011 पर्यंतची बोगस देयके काढू नये.
> जलप्रदाय विभागात भ्रष्टाचार लिकेज्स कमी करा.
> अवैध बांधकामांना ऊत आला आहे ते थांबवा, खंडणी उकळणार्‍यांवर कारवाई करा.
> फॉगिंग मशीन बंद आहेत, त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढती आहे.

लाल दिवा गेला
पन्नास टक्के उपस्थिती
भारिप-बमसंच्या पन्नास टक्के नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती. मनपात पक्षाचे सात निर्वाचित, तर एक स्वीकृत असे आठ नगरसेवक आहेत. महापौर व नगरसेविका ज्योत्स्ना गवई, महादेव उर्फ बबलु जगताप, मंगला घाटोळे, वैशाली मानवटकर यांची उपस्थिती नव्हती, अरुंधती शिरसाट, गजानन गवई, रामा तायडे, अँड. धनर्शी देव अभ्यंकरांची उपस्थिती.

‘काँग्रेस’ संपर्कात कोण
भारिप-बमसं येथे महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत असताना या ठिकाणी काही नेते अनुपस्थित असल्याची चर्चा रंगली. अनुपस्थित असलेल्या नेत्यांपैकी एक नेता काँग्रेसच्या मुंबईस्थित नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या संपर्कात असलेला पक्षातील हा नेता कोण, असा प्रश्न आंदोलनस्थळी चर्चिला गेला.

टक्केवारी मागणारा पदाधिकारी कोण ?
या वेळी निवेदन देताना प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी पदाधिकारी टक्केवारी मागत असल्याचा आरोप केला. पदाधिकारी बिल्डरकडून खंडणीची मागणी करत असेल, तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, बिल्डरांनी भयमुक्त व्हावे, असे पुंडकर म्हणाले. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत अवैध बांधकामप्रकरणी खंडणी मागणार्‍यांवर फौजदारी दाखल करण्याची सूचना केली. दरम्यान, बिल्डरांकडून खंडणी मागणारा पदाधिकारी कोण, हा प्र्श मात्र अनुत्तरित राहिला.

महापौर व आयुक्तांच्या गाड्यांवरील अनुक्रमे लाल व अंबर दिवा काढल्याने अनेकांची मोठी पंचाईत होत आहे. महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढल्याने त्यांची गाडी कुठे जाते, असा प्रश्न कार्यकर्त्यांना आज होता. भारिपचे आंदोलन सुरू असताना महापौरांची गाडी शहरातील पूर्व भागात फेरफटका मारत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.