आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Leader Ramdas Athawle's Demand Full Fill Sasy Vinod Tawde

आठवलेंना काय हवे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे - विनोद तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं नेते रामदास आठवले हे वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा करीत आहेत, हे बरोबर आहे. पण आठवलेंना नक्की काय हवे, ते आम्हाला चांगले ठाऊक आहे आणि आम्ही ते आठवलेंना देऊ,’ असे सूचक वक्तव्य महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज केले.

विनोद तावडे यांनी आज दैनिक दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आठवलेंच्या दाव्यावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी विनोद तावडे यांनी विविध मुद्दय़ांवर दिलखुलास चर्चा करून शासनावर चौफेर टीका केली.

राज्यात गुन्हेगारांचा प्रभाव वाढत आहे. राजकारणातही गुन्हेगारीचा प्रभाव वाढत असून, सत्ता आणि पैशांच्या मोहामुळे राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होत आहे. गुन्हेगारांना राजकारणात आणण्यामागे सत्ताधार्‍यांचाही मोठा वाटा आहे. सन 1992 सारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्या वेळी राजकारणात गुन्हेगारी वाढली होती, ती युती सरकारने संपुष्टात आणली होती. पुढील निवडणुकीत राजकारणातील गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहणार आहे.

गृहमंत्री पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे नेते टीका करीत आहेत. याविषयी विचारले असता, ते म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार, अहमद पटेल हे गृहविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करतात. त्यामुळे हे अधिकारी आर. आर. पाटील यांचे ऐकतसुद्धा नाहीत. राज्याचे गृहमंत्री साहेबांच्या आदेशानुसार ‘तोंड पाटील की’ करण्यातच धन्यता मानत असल्याची टीका विनोद तावडे यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केली.

कोरडवाहू शेती अभियानांतर्गत दहा हजार कोटींचे पाच वर्षांत लक्ष देण्यात आले आहे. दरवर्षी दोन हजार कोटी दिले, तर हे लक्ष पूर्ण होणे शक्य आहे. मात्र, 350 कोटीसुद्धा आले नाहीत. केवळ जाहिराती मोठय़ा करायच्या, प्रत्यक्षात कृती काहीच नाही. जाहिरातीच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करणे सध्या सुरूअसून, सत्ताधारी स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात व्यस्त आहेत. भूमी अधिग्रहण कायदा केला. जमिनीचे भाव बाजारभावाच्या चौपट झाल्याचे सांगून सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहे. प्रत्यक्षात सध्याच्या बाजारभावाच्या जवळपास पोहोचणार्‍या रेडीरेकनरच्या चारपट भाव मिळू शकतो. त्यामुळे बाजारभावाच्या चारपट किमतीच्या सरकारचा दावा केवळ फसवणूक करणारा आहे. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. जगन्नाथ ढोणे, प्रतुल हातवळणे, अँड. गिरीश गोखले, दीपक मायी आदी उपस्थित होते.