आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम संपले, तरी नोकरी ‘निरंतर’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - साक्षरतेचे प्रमाण 50 टक्क्यांवर असलेल्या जिल्हय़ात निरंतर शिक्षण विभागाकडे कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. जिल्हय़ात 15 निरंतर शिक्षण अधिकारी वेतन तर घेत आहेत. पण, काम न करण्याचे!

एकीकडे अनेक विभागांत कमी कर्मचारी आहेत, म्हणून लोकांची वेळेवर कामे होत नाहीत. निरंतर शिक्षण विभागात अधिकारी- कर्मचारी मात्र काम नाहीत म्हणून रिकामे बसून आहेत. प्रौढ साक्षरता कार्यक्रम संपल्यानंतर कें्रद सरकारने सन 2009 मध्ये साक्षर भारत कार्यक्रमाची घोषणा केली होती. किमान 50 टक्के महिला साक्षर होईपर्यंत भारत कार्यक्रम सुरू राहणार आहे. सध्या राज्यातील उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, नंदुरबार, नांदेड आणि बीड या नऊ जिल्हय़ांमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या जिल्हय़ामध्ये साक्षर भारत योजना निरंतर शिक्षण विभाग राबवत आहे. मात्र, इतर जिल्हय़ांमध्ये महिला साक्षरतेने 50 टक्क्यांहून जास्त होऊनही हा कार्यक्रम संपला असूनही, या जिल्हय़ांमध्ये राज्य सरकारने शिक्षणाधिकार्‍यांची पदे भरली आहेत.