आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचार्‍यांचे वेतन रखडले; कुटुंबावर उपासमारीची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अकाऊंटटं तथा डाटाएन्ट्री आॅपरेटर या पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे मागिल तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. विशेष म्हणजे प्रत्येकांकडून दोन हजार रुपये जमा केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला. यावर तत्काळ तोडगा न काढल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातुर, अकोला, नागपूर, यवतमाळ या आठ विभागामधील दोन हजार 2९८ पदे कंत्राटी पध्दतीने ‘ईगल सिक्युरीटी अँन्ड पर्सनल सव्हीर्सेस’ या कंपनीच्या माध्यमातून भरण्यात आले होते. ही पदभरती यवतमाळात घेण्यात आली होती. ६ फेब्रवारी 2014 रोजी आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील ८6 पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात आली. या कर्मचार्‍यांचे बँक खाते उघडण्यासाठी कंपनीने संपूर्ण कागदपत्रे जमा केली होती. सध्याच्या परिस्थितीत अनेक कर्मचार्‍यांचे बँक खातेसुद्धा उघडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना गेल्या तीन महिन्याचे वेतन त्यांना प्राप्त झाले नाही. यासंदर्भात कर्मचार्‍यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या प्रकारांमुळे कर्मचार्‍यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत समायोजन करावे, अशी मागणी केली. यावर त्वरित तोडगा काढला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपूरे यांनी 15 दिवसात प्रश्न न सुटल्यास जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र बहूतांश ठिकाणी कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत तक्रारी आहेत.
प्रत्येक कर्मचार्‍यांना बँकेत खाते उघडण्यासाठी कंपनीच्या वतीने कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कर्मचार्‍यांनी संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करून दिले होते. मात्र आज जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी कर्मचार्‍यांचे खाते उघडल्याच गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारांमुळेच वेतन रखडल्याची माहिती समोर आली आहे. याकडे कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.