आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनपाल, वनरक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करा, शासन दूर्लक्ष करत असल्‍याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्यभरात वनपाल, वनरक्षकांच्या अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करावी इतर मागण्यांसाठी २५ ऑगस्टपासून संप सुरू असून, त्याची अद्याप दखल घेतल्याने सप्टेंबरला जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली निवेदन सादर करून दखल घेण्याची मागणी केली.
राज्यातील मौल्यवान वनसंपदेचे संरक्षण करणा-या वन कर्मचा-याकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. वनरक्षक, वनपाल हे प्रामाणिकपणे त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करीत असताना प्रसंगी जोखीम स्वीकारतात, जीव धोक्यात घालतात. वनरक्षक, वनपाल यांचे महसूल विभागातील पोिलस विभागातील काही समकक्ष पदांचा विचार केल्यास १९६२ पासून वारंवार वेतनश्रेणीमध्ये शासनाने वन विभागातील वर नमूद पदांना दुय्यम दर्जाचे स्थान देऊन समाधानकारक वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ केली. या मुख्य मागणीसाठी राज्यातील वनरक्षक, वनपाल गत ११ दिवसांपासून संपावर आहेत. तरीही शासनाने याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. तरी शासनाने दखल घेऊन अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी. वन महसूल विभाग एकच असून, तलाठ्यांप्रमाणे वेतनश्रेणी असावी. तसेच कायमस्वरूपी प्रवास भत्ता लागू करावा. अनुकंपा तत्त्वावर वन कर्मचा-यांना पाल्यांना नियुक्ती मिळावी. वन्यजीव विभागात एकस्तर पदोन्नती मंजूर करावी तसेच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयीसवलती द्याव्यात, आदी मुख्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना अकोला शाखेचे अध्यक्ष अब्दुल चाऊस, उपाध्यक्ष एस. ए. मेश्राम, सचिव एस. आर. नंदुरकर, ए. एस. थोरात, एम. बी. आडे, सहसचिव आशा धोत्रे, कोषाध्यक्ष आर. एस. कातखेडे, व्ही. व्ही. हलगे, ए. आर. घुगे, पी. एन. खंडारे, सी. डी. जाधव, जी. बी. पल्हाडे, पी. बी. िगते आदींसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
वनसंपदेचावाली कोण?
आंदोलनामुळेसध्या वनसंपदा उघड्यावर असून त्याला वाली कोन? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गत २५ ऑगस्टपासून कर्मचारी संपावर असून आज सप्टेंबर उजाडले तरी शासनाकडून त्यांची दखल घेतलेली नाही, वा पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वनक्षेत्र, अभयारण्यात मुक्त संचार करण्यास, वृक्षतोडीस तसेच शिकारीस खुली सुट असल्यासारखे वातावरण आहे. वनरक्षक, वनपाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी िजल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.