आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला येथील विक्रीकर अधिकारी यास ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई विक्रीकर भवन कार्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान सापळा रचून करण्यात आली.

विनोद नथ्थूपंत निकम असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाना येथील तो रहिवासी आहे. त्याचे कुटुंब मुंबई येथे असून, तो एकटा अकोल्यात राहतो. निकम याने बोरगावमंजू येथील एका तक्रारदारास नोटीस बजावून व्यवसाय कराच्या संबंधाने कार्यालयात बोलावले कमी कर आकारतो, अशा दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी २० हजार रुपये म्हणजेच ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्यास दंड, व्याज, अशी मोठी रक्कम भरावी लागेल, असे तक्रारदारास सांगितले. तडजोडीनंतर गुरुवारी ४० हजार रुपये द्यायचे ठरले होते.

त्यानुसार तक्रारदाराने अकोला एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने गुरुवारी सकाळपासूनच विक्रीकर कार्यालयात सापळा लावला होता. तक्रारदार ४० हजार रुपये घेऊन गेला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना निकम यास रंगेहात अटक केली. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा तो मुंबई येथे पदोन्नतीवर जाणार होता.

स्वीकारली होती यापूर्वीही लाच
लाचखोरविक्रीकर अधिकारी विनोद निकम हा मुंबईमध्ये विक्रीकर निरीक्षक असताना त्याला एसीबीने २००३ मध्ये पकडले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यातून तो २०१० मध्ये निर्दोष सुटला होता. त्यानंतर २०११ पासून पुन्हा तो अकोला येथे पदोन्नतीवर व्यवसाय कर अधिकारी म्हणून नियुक्त झाला होता. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा तो मुंबई येथे पदोन्नतीवर जाणार होता.

दोन हजार लोकांना दिल्या होत्या नोटीस
व्यवसायकर विभागाने जिल्ह्यातील एकूण दोन हजार व्यावसायिकांना लोकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यातील बऱ्याच प्रकरणात निकम याने लाच स्वीकारली आहे. त्यामुळे निकम याच्या लाचखोरीला बळी पडलेल्यांनी एसीबीकडे तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून निकम रडारवर
अनेकदिवसांपासून विनोद निकमच्या तक्रारी एसीबीकडे आल्या होत्या. एसीबीने यापूर्वी अनेकवेळा निकमला रंगेहात पकडण्यासाठी सापळे लावले होते. मात्र, तो एसीबीला गुंगारा देत होता. अखेर गुरुवारी शेवटी तो एसीबीच्या जाळ्यात अडकला.