आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात साठेबाजी - गौण खनिज चोरीचा जिल्ह्यात धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील नदीपात्रातून भरदिवसा गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीपात्रांची चाळणी होत असून, या प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

सध्या शहरी भागात बांधकामाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी रेती मिळत नाही, असे सांगत रेती सम्राटांकडून एकीकडे सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. छुप्या मार्गाने चोरून नेण्यात येत असलेली ही सर्व अवैध रेती शहरातील विविध भागांत साठवली जात आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणांच्या रेती घाटातून गौण खनिजाचे सर्रास खोदकाम सुरूच आहे. यामध्ये महसुलाची मोठी चोरी होत आहे. अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सद्य:स्थितीत १८८ रेती घाट आहेत. या सर्व घाटांचा अधिकृत िललाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. चारदा लिलाव करण्यात झाल्यानंतरही अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर बार्शिटाकळी या तालुक्यांतील बऱ्याच घाटांचे िललाव बाकीच आहेत. शासनाकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी २७५ घाटांचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांपैकी केवळ १८८ घाटांना मान्यता देण्यात आली. रेतीसाठा असल्यानंतरही या स्पॉटचा लिलाव झाल्याने गौण खनिजाची चोरी होत आहे. एकीकडे ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेआधी जास्तीत जास्त रेती नेण्यात येत आहे.
ऑनस्पॉट होतेय विक्री
जिल्ह्यामध्येनदीकाठची रेती अवैध मार्गाने विकली जात असताना महसूल प्रशासनाकडून या प्रकाराला पायबंद घालण्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नदीपात्रात मिळेल त्या ठिकाणची रेती जमा करून ग्राहकाला ऑन स्पॉट विकली जात आहे.

दृष्टिक्षेपात नदीपात्र
- बार्शिटाकळी- काटेपूर्णा
- मूर्तिजापूर - उमा
- पातूर - मोर्णा
- पातूर - निर्गुणा
- अकोला - मोर्णा
- तेल्हारा - विद्रूपा
अकोला तालुक्यातील पूर्णेच्या पात्रातून गौण खनिजाची चोरी सुरू आहे.

आमचे लक्ष
- गौणखनिजाच्या चोरीवर िनयंत्रण आणण्याची जबाबदारी ही तलाठी मंडळ अधिकाऱ्यांची आहे. गौण खनिजाच्या साठेबाजीकडे ३० सप्टेंबरनंतर लक्ष देण्यात येईल.'' सुनीलपाटील, जिल्हाखनिकर्म अधिकारी, अकोला.
त्रिकूट करते तरी काय?
गौणखनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी तहसीलदार, पोलिस आणि आरटीओ या तीन अधिकाऱ्यांची आहे. मात्र, चोरीचे प्रकार लक्षात घेता, हे त्रिकूट करते तरी काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तलाठ्यांचे दुर्लक्ष : वाळूचीचोरी होत असताना स्थानिक तलाठी मात्र, या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे रेती माफियांचे चांगलेच फावत आहे. तलाठ्यांचे तर दुर्लक्ष होतच आहे. पण, सोबतच मंडळ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.