आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकेव्हीत केले जातेय अवैध उत्खनन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महसूल विभागाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. शिव मंदिर परिसरात नाला खोदकाम करण्यात येत आहे. खोदकामाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवली नसल्याची तक्रार जिल्हधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील गुडधी निवासस्थानाच्या बाजूला फोर एस विहिरीजवळील नाल्याचे लाखो रुपयांचे काम केले आहे. जानेवारी 2013 मध्ये नाल्याचे 0.30 सें.मी. खोदकाम केले आहे. हे खोदकाम कोणत्याही निविदेद्वारे न केल्याचा आरोप तक्रारकर्ते रामदास जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केला आहे. सुरू असलेल्या कामात घोळ असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

विद्यापीठांतर्गत ड्राय लँड व वॉटर सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट व विद्यापीठ अभियंता कार्यालयामार्फत या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. शेततळ्याची निविदा काढून त्यामधील मुरूम रोडवर टाकून रोडचेसुद्धा देयक काढल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍याकंडे केली आहे.

उत्खननाची परवानगी नाही
पीकेव्ही परिसरात नाल्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. याबाबत घटनास्थळाची पाहणी करणार आहे. उत्खनन होत असल्यास दंड करण्यात येईल. सोहम वायाळ, उपविभागीय महसूल अधिकारी, अकोला.

रेती आणि मातीची तस्करी?
परिसरात नाल्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या माध्यमातून रेती तसेच मातीची तस्करी केली जात असण्याची शक्यता वर्तवली जात असून, याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.