आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांचा हैदोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रेतीच्या उपसावर बंदी असताना अकोला तालुक्यातील पूर्णा नदी काठच्या काही गावांमध्ये साठा करण्यात आलेल्या रेतीची विक्री होत आहे. त्यामुळे महसूल विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

जिल्हय़ातील वाळू माफियाकंडून महसूल विभागाच्या खनिकर्म विभागाने 2012 व मार्च 2013 अखेरीस सुमारे 72 लाखांच्यावर दंड वसूल केला आहे. याप्रकरणी तब्बल 99 वाळू माफीयावर पोलिस कारवाई करण्यात आली असल्याची माहिती खनिकर्म विभागाने दिली. यावर्षी जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील रेती स्थळांचे लिलाव दोन ते तीन महिने उशिरा करण्यात आले होते. याचा फायदा जिल्हय़ातील वाळू माफियांना चांगलाच झाला आहे. रेती स्थळांचे लिलाव झाल्यानंतरही जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करण्यात आला आहे. यावर अनेकदा पोलिस कारवाई करण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यात अवैध रेतीचा उपसा करण्याचा सपाटा वाळू माफियांनी लावला होता.

दोन ट्रॅक्टरवर कारवाई : दहिहांडा पोलिस स्टेशन हद्दीतील रोहणा फाट्यावर महसूल विभागाने गुरुवारी दोन ट्रॅक्टर पकडले आहे. अवैध रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरांना प्रत्येकी नऊ हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केली आहे. याप्रकरणाची तक्रारदेखील दहिहांडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे.