आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये मध्यरात्री होते वाळूची तस्करी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात मोठय़ा प्रमाणात रोज मध्यरात्री रेतीची तस्करी होत आहे. शहरात वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाले आहे. यामुळे महसूल विभागाला लाखोंचा चुना लागत आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. काही खासगी बांधकाम अधिक होत आहे. रेती उपशाला बंदी आहे. राज्य शासनाने रेती उत्खननावर कडक निर्बंध घातले आहे. यासाठी पर्यावरण आघात मूल्यांकन समितीची स्थापनादेखील करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यामातून अवैध उत्खननावर पायबंद घलण्यात आला आहे. मात्र, हे सर्व नियम अटी पायदळी तुडवित शहराच्या आजू बाजूला नदी पात्रातून अधिक प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. मागील पाच महिन्यांत आठ लाखांचा दंड अवैध वाळू माफियाकडूंन वसूल केल्याचे सांगण्यात आले आहे. अवैध मार्गाने होणार्‍या वाहतकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अकरा मंडळ अधिकारी आणि 63 तलाठी असा अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना महसूल विभागाला किंवा संबंधितांना दिल्यास त्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांच्याकडून दंडसुद्धा आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र हांडे यांनी दिली. कारवाईचे आदेश.