आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अध्यात्मिक संत आसाराम बापूंविरुद्ध अपप्रचार थांबवावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- संत आसाराम बापू यांच्याविरुद्ध जो अपप्रचार सुरू आहे. तो थांबवावा, अशी मागणी संत आसाराम बापू यांच्या भक्तगणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाद्वारे करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांमार्फत देशाच्या पंतप्रधानांना सोमवारी 26 ऑगस्टला निवेदन देण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून संत आसाराम बापूंविरुद्ध जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने अतिशय खालच्या पातळीवर अपप्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे आसाराम बापूंचा भक्तगण दुखावला आहे. त्यामुळे तो अपप्रचार थांबवावा, अशी मागणी संत आसाराम बापू यांच्या भक्तांद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिला भक्त सहभागी झाल्या होत्या.