आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarang Gaikwad Murder Case Four Arrested News In Divya Marathi

सारंग गायकवाड हत्या प्रकरण; चौघांना १३ पर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डाबकी रोडस्थित मास्टर पॉवर जिमजवळ सारंग गायकवाड या २२ वर्षीय युवकाची शनिवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटकेतील चारही आरोपींना न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी जुने शहरस्थित भारती प्लॉट येथील रहिवासी सारंग अशोक गायकवाड याची डाबकी रोडवर असलेल्या मास्टर पॉवर जिमजवळ अभिषेक खरसाळे, निखिल सहारकर, संतोष चितोडे सतीश भोसले या चार युवकांनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याच्या डोक्यावर फरशी फोडून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या सारंगला जिमचे कोच पीयूष धुमाळे जिममधील युवक मयूर सरोदे यांनी उपचारासाठी सर्वोपचारमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आपल्या तपास कार्याला प्रारंभ करताच यातील चारही आरोपींनी पोलिसांना आत्मसमर्पण केले होते.

चारही आरोपींच्या चौकशीनंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सात दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास डाबकी रोड पोलिस करत आहेत.