आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरीचे माजी सरपंच बंडू गिरी यांचा खून, विदर्भ बीअरबारमध्ये चढवला हल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मलकापूर येथील सरपंच सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडाला महिना उलटत नाही तोच, अकोला शहरानजीकच्या उमरी येथील माजी सरपंच महेंद्र उर्फ बंडू दिगांबर गिरी (पुरी-गोसावी) यांचा खून झाल्याची घटना 28 सप्टेंबरला सकाळी उजेडात आली. मृतदेह गुडधीरोडवरील रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विदर्भ वाइन बारमध्ये खून झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार प्रकाश सावकार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुभाष माकोडे, एपीआय शेळके यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून दगडासह इतरही साहित्य जप्त केले. याप्रकरणी बंडू यांचे भाऊ हेमंत गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी सुभाष उर्फ पिंटू इंगळे, बालू वानखडे, संदीप वानखडे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम 302 अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

कट रचून केली हत्या :
बंडू गिरी यांचा खून कट रचून करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी रात्री बंडू यांच्या घरी पिंटू आणि बालू पोहोचले. या ठिकाणी दोघांनी बंडू यांच्याशी वाद घातला. यानंतर विदर्भ वाइन बारमध्ये आणून त्यांची हत्या करण्यात आली.

मृतदेह आढळला रस्त्याच्या कडेला :
बंडू गिरी यांच्यावर विदर्भ वाइन बारमध्ये 27 सप्टेंबरला रात्री 3 नंतर हल्ला करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्ला झाल्यानंतर बंडू यांच्याच दुचाकीवर त्यांना घेऊन आरोपी गुडधीकडे रवाना झाले.