आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोपचारमध्ये क्षयरुग्णांना हलवले, स्वतंत्र खोलीत व्यवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सर्वोपचार रुग्णालयाने गांभीर्य दाखवत सोमवारी क्षयरोग वॉर्डातील सामान्य रुग्णांना दुसर्‍या खोलीत हलवले. रुग्णालयात क्षयरोग पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांवरही उपचार केले जात होते.

या प्रकाराने सामान्य रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने सोमवारी प्रकाशित केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने त्वरित कारवाई करत रुग्णांवर त्याच वॉर्डातील दुसर्‍या खोलीत उपचार करण्यास सुरुवात केली आहे.

वर्षभरापासून क्षयरोगींसोबतच सामान्य रुग्णांनाही एकाच वॉर्डात ठेवले जात होते. एमडीआर टीबी आणि नॉर्मल टीबी असा कुठलाही फरक न ठेवता एकाच छताखाली सर्वांवर उपचार सुरू होते. जिल्हा कोअर कमिटीला याची कल्पना असतानाही याची दखल घेतली जात नव्हती. अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी याची दखल घेत वॉर्डातील स्थितीबाबत माहिती घेतली. पॉझिटिव्ह रुग्णांना इतर वॉर्डात ठेवण्याच्या सूचना त्यांनी वॉर्डाचे प्रमुख डॉ. अमोल फुलाडी यांना दिल्या. यानंतर ही कारवाई झाली.

स्पुटम चाचणी
96 एमडीआर टीबी रुग्ण

941 निगेटिव्ह

230 टीबी पॉझिटिव्ह

1,171 तपासणी

स्वतंत्र व्यवस्था केली
वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, पॉझिटिव्ह रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था वेगळ्या खोलीमध्ये केली आहे. याही पुढे जाऊन आम्ही लवकरच छाती व श्वसन रोगनिदान विभागांतर्गत स्वतंत्र वॉर्ड तयार करणार आहोत. त्यामुळे आपोआपच टीबी वॉर्ड वेगळा होईल. डॉ. राजेश कार्यकर्ते, प्रभारी अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष
वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास याबाबत लेखी खुलासा मागण्यात येईल. एमडीआर टीबी रुग्णांकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात येतील. डॉ. छाया देशमुख, शहर क्षयरोग अधिकारी, अकोला.