आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नो व्हेइकल डे’द्वारे इंधन बचतीचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला बार असोसिएशनने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘नो व्हेइकल डे’ या उपक्रमामध्ये गुरुवारी शेकडो विधिज्ञांसह अकोला जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशही सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल बचतीचा संदेश देण्यात आला.

दर महिन्याच्या 1 तारखेला ‘नो व्हेइकल डे’चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला रविवारची सुटी असल्याने अकोला बार असोसिएशनचे सदस्य व सर्व न्यायाधीश यांनी 31 ऑक्टोबरलाच नो व्हेइकल डे राबवला. न्यायालयीन कर्मचारी संघटनेनेही यापुढे हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येने पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या बचतीमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी अकोला बार असोसिएशनने पुढाकार घेत दर महिन्याच्या एक तारखेला आपली वाहने बंद ठेवून ‘नो व्हेइकल डे’चा उपक्रम राबवण्याचा ठराव अकोला बार असोसिएशनच्या सभेत एकमताने पारित केला होता. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात एक हजार विधिज्ञांनी सहभाग घेतला असून, त्यामुळे 350 चारचाकी व सुमारे एक हजार दुचाक्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. विधिज्ञांच्या या उपक्रमामुळे एक हजार लिटरच्या पेट्रोलची बचत झाली आहे. यामध्ये आता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश आणि प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकार्‍यांसह सर्वच न्यायाधीश तसेच संघटना सहभागी झाल्या आहे. अकोला बार असोसिएशनने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘नो व्हेइकल डे’ उपक्रमाला न्यायाधीशांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल बचतीचा एक चांगला संदेश नागरिकांमध्ये गेला आहे. उपक्रम यशस्वी झाल्यास याचा प्रचार करून यामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
उपक्रमात यांचा होता सहभाग
‘नो व्हेकइल डे’ या उपक्रमामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्र. ची. बावस्कर, सत्र न्यायाधीश एस. डी. सावदेकर व व्ही. ना. तांबी यासोबत अकोला बार असोसिएशन अध्यक्ष अँड. प्रकाश वखरे, उपाध्यक्ष अँड. संजय तळोकार, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता, अँड. मुकुंद जालनेकर, अँड. मंगला पांडे, जिल्हा सरकारी वकील सुभाष काटे, सरकारी वकील सुभाष फाटे, अँड. राजेश जाधव, अँड. अनिस अहमद व रजिस्टार बोगरकर आदी सहभागी झाले होते.