आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० टक्के शाळांवर नाही मुख्याध्यापक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा उंचावण्याचे आव्हान शिक्षण विभागासमाेर अाहे. मात्र, बहुतांश शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी गेल्या वर्षभरापासून ७ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या घसरत आहे. पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घालायला तयार नाही. कारण या शाळांमध्ये कुणाचा पायपोस नसल्यामुळे या शाळांना घरघर लागली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घसरत असली, तरी नव्या धोरणानुसार शिक्षक मात्र अतििरक्त ठरत असताना या शिक्षकांना कुणी प्रमुख नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये नेतेिगरी करताना दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेकडे ११ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ७ शाळांमध्ये वर्षभरापासून मुख्याध्यापकच नाहीत, त्यामुळे या शाळा प्रभारींच्या खांद्यावर आहेत. काळजीवाहू मुख्याध्यापक असल्यामुळे अशा मुख्याध्यापकांना शिक्षक तोलत नाहीत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत या शाळांना पर्याप्त निधी िमळत असतानाही मुख्याध्यापक नसल्यामुळे वदि्यार्थ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहोचत नाहीत. केवळ खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देण्याइतपतच कार्यक्रम राबवण्यातच शिक्षण विभाग धन्यता मानत आहे.
याच शाळांमध्ये आहेत मुख्याध्यापक
माध्यमिक शिक्षण विभागाची कार्य
खासगी माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना मान्यता देणे.
माध्यमिक शाळांना शैक्षणिक सवलतीअंतर्गत अनुदान वितरित करणे.
शाळांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे
दहावी व बारावी परीक्षांचे निकाल उंचावण्याकरिता निकाल सुधार प्रकल्प राबवणे.
इतर ४० शाळांचीही तीच बोंब : जि.प.चे पूर्णपणे नियंत्रण असलेल्या माध्यमिक शाळांची संख्या ४३० आहेत. त्यापैकी ४० शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत, तर विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, आश्रमशाळा अशा शाळांमिळून ६९० माध्यमिक शाळा जिल्ह्यामध्ये आहेत. संस्थांध्यक्षांच्या मर्जीनुसार लायक मुख्याध्यापक नसल्यामुळे या शाळांतील मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न रेंगाळला आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील शाळा
माध्यमिक शाळा -३४६
अनुदानित शाळा -२४६
कायम अनुदानित शाळा-५६
कायम विनाअनुदानित शाळा -२३
राज्य शासन माध्यमिक शाळा-०१
जिल्हा परिषद शाळा-११
आश्रमशाळा-०७
तेल्हारा तालुक्यातील अडगाव
हरिहरपेठ जिल्हा परिषद शाळा, अकोला.
मूर्तिजापूर जिल्हा परिषद शाळा
सावित्रीबाई कन्या शाळा