आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्यावर भुरळ पाडणारी कार्टून्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शाळेला सुटी असल्याने बच्चे कंपनीच्या मनावर दूरचित्रवाणीवरील काटरून्सच्या पात्रांनी चांगलेच राज्य केले. आता काही दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्यांचे आगमन झाले आहे. या साहित्यावरही काटरून्सची आवडती पात्रे असल्याने बच्चे कंपनीच्या त्यावर उड्या पडतील, असे दिसते.
परीक्षा संपल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. या कालावधीत विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून मनोरंजन करून घेतले. वाढत्या उन्हामुळे बाहेर न जाता घरातच बसून काटरून्स पाहत असल्याने या काटरून्सच्या पात्रांसोबत बच्चे कंपनीची चांगलीच मैत्री झाली होती. शाळा सुरू झाल्या की केबल कनेक्शन निघू शकते. त्यामुळे बच्चे कंपनीपासून छोटाभीम, सर्वे सफर, मिक्की माऊस, अँँग्री बर्ड्स दुरावतील. या मित्रांची भेट अधूनमधून होणार असल्याने विद्यार्थी नाराज आहेत. जूनच्या शेवटी शाळा पुन्हा सुरू होतील. बाजारात आलेल्या साहित्यावर काटरून्सच्या प्रतिमांचा उपयोग केला आहे. त्यातून काटरूनशी विद्यार्थ्यांची जवळीक साधली जाईल. बाजारपेठेतील बॅग्ज, वॉटर बॉटल, कंपास, टिफीन या साहित्यावर छोटा भीम, अंग्री बर्ड्स, सर्वे सफर, स्पायडर मॅनी, मिक्की माऊस, बार्बी डॉल अशा प्रसिद्ध काटरून्स पात्रांच्या प्रतिमांचा उपयोग करण्यात आला आहे. बच्चे कंपनीची आवडत्या कार्टून्स पात्रांशी भेट होणार आहे.