आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतच मिळणार विद्या‌र्थ्यांना जातीचे दाखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कोणत्याही प्रकारचे दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शासकीय कार्यालयांचे अनेकदा उंबरठे झिजवूनही प्रमाणपत्रे वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. मात्र, आता अकोला तालुक्यातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र शाळेतच मिळणार आहे.
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत हा उपक्रम अकोला तालुक्यातील प्रत्येक शाळेत राबवल्या जाणार आहे. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालकांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी हा उपक्रम शाळेतच राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्यांदा दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्याविद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार पूजा माटोडे यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारीदिली आहे. नायब तहसीलदार आराधना निकम, प्रतीक्षा तेजनकरसुद्धा हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. २०डिसेंबरपर्यंत या उपक्रमाची माहिती सर्व शाळांमध्ये देण्यात येत आहे. त्यानंतरच्या आठवड्यात कागदपत्रे गोळा करण्याचे काम होईल.
या कागदपत्रांची आवश्यकता
नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
१) तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
२) रहिवासी पुरावा
३) जातीचा दाखला
-हा उपक्रमविद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे मुख्याध्यापक,शिक्षक सेतू संचालकांनी एकत्र येऊन काम करावे. तलाठ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.'' प्रा.संजय खडसे, उपविभागीयअधिकारी, अकोला.

असा आहे उपक्रम
पहिल्याटप्प्यात सर्व शाळांमध्ये या उपक्रमाची मुख्याध्यापक माहिती देतील. सेतू संचालक शाळेत जाऊन प्रकरणे गोळा करतील. आवश्यक ते मार्गदर्शन करतील. त्रुटी आढळल्यास त्याचे िनराकरण केले जाईल.
सरांची घेतली शाळा
याउपक्रमाची मािहती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मुख्याध्यापक, तलाठी सेतू संचालकांची संयुक्त बैठकसुद्धा घेतली आहे.या बैठकीला शिक्षकांसह मुख्याध्यापकांची उपस्थिती हाेती.