आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बस नियमांना ‘खो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बसची सक्ती राज्य सरकारने केली़ मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरीही त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही़ वाहन पासिंगसाठी आल्यानंतरच स्पीड गव्हर्नरही बसवले जात आहेत़ स्कूल बसचे धोरण काही शाळांनी कागदावरच ठेवले असून, पालकांकडून मनमानी शुल्क आकारले जात़े त्यातही आरटीईच्या अंमलबजावणीमुळे वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद पडल्यास विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनणार आह़े

विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जात़े त्यानुसार परिवहन आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थी वाहतूक करणार्‍या स्कूल बससाठी विशिष्ट नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करणे शाळांना बंधनकारक आहे. शिवाय याला कायदेशीर आधारही देण्यात आलेला आहे. शहरात सध्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूल बसची संख्या 92 आह़े राज्य सरकारने किमान तीन किलोमीटर अंतर असलेल्या शाळांतून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बस सक्तीची केली. मात्र, शहरात बहुतांश शाळांत विद्यार्थी स्कूल बसऐवजी अन्य वाहनानेच येतात. स्कूल बस धोरणाचे पालन करणार्‍या शाळांना सरकारने करात भरघोस सवलत देऊ केली आहे. एकीकडे अशा सवलतीचे फायदे लाटणारे बस मालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात़, त्या तुलनेत धोरणातील निकषांचे पालनही केले जात नाही. काही बसना स्पीड गव्हर्नरही बसवलेले नाहीत. सध्या एका रिक्षात पंधरा ते वीस मुले असतात. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने अनेकदा अपघात झाल़े

ऑटो व व्हॅनमधून अवैध वाहतूक
स्कूल बसच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या जीवाचा खेळ मांडला जात आहे. अवैध वाहतुकीमुळे शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या. त्यानंतर स्कूल बस धोरण आखण्यात आले. मात्र, शाळांनी स्कूल बस धोरणालाच हरताळ फासला आहे.

स्कूल बसचे असे नियम..
- चालकाला किमान पाच वर्षांचा अनुभव पाहिज़े
- विद्यार्थ्यांचे डोके खिडकीतून बाहेर येऊ नये म्हणून खिडकीला तीन बार असावेत़
- विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी सीटच्या वर अथवा पायाजवळ रॅक असला पाहिज़े
- बसला इर्मजन्सी डोअर असावा़
- बसची पहिली पायरी ही जमिनीपासून 300 स़े मी़ उंचीवर असावी़
- 25 हून अधिक क्षमता असलेल्या बसमध्ये तीन फायर एक्स्टेन्शन असावेत़
- बसचा वेग 40 किलोमी़टर प्रती तासापेक्षा अधिक असता कामा नय़े
- 25 आसन क्षमता असलेल्या बसमध्ये एक फायर एक्स्टेन्शन असाव़े
- प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसवणे गरजेचे आहे.
- गाडी योग्यता प्रमाणपत्र असावे.
- मुलींच्या बसमध्ये महिला सेविकेची नियुक्ती असावी.
- क्षमतेइतकीच विद्यार्थी संख्या असावी.