आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scientific Approach,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैज्ञानिक दृष्टीचा विकास व्हावा, अविनाश देव यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शालेय अभ्यासासोबतच इतर प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. विद्यार्थी जीवनातच मुलांनी विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. त्याचा भविष्यात बराच फायदा होतो. इतर विषयांचे अध्ययन करताना त्यातील विज्ञान जाणून घेतले पाहिजे. मुलांमध्ये बालवयातच वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली पाहिजे, असे मत ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अविनाश देव यांनी व्यक्त केले. वाशीम रोड येथील प्रभात किड्स स्कूल येथे राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकाता, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या ३३ व्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अाहे. उद््घाटन समारंभात अविनाश देव यांनी विज्ञान मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास फायदा होतो, असे म्हटले. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा, मेळावे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांनी नेहमी शिकण्याची तयारी ठेवावी तसेच प्रयत्नशील असावे, असे ते म्हणाले. एखाद्या समस्येची जाण लहान वयात होणे, विषयातील वैज्ञानिक बाबी स्पष्ट करणे या गोष्टी आत्मसात करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे, असे प्रतिपादन प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असून, समाजाच्या दृष्टीने ते हिताचे आहे. तसेच आजचे विद्यार्थी विज्ञानासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. बाल वैज्ञानिकांनी नेहमी चौकस असावे, असे मत रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांनी व्यक्त केले. सभोवताली घडणाऱ्या घटना, परिस्थिती यांचे अवलोकन करून त्यातून शिकावे, असे त्यांनी सांगितले.
विज्ञान हे फक्त शालेय अभ्यासक्रमातील एक विषय नसून, एखाद्या घटकातील सत्य शोधण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या आधारे ते शोधावे, असे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी प्रतिपादन केले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी मार्गदर्शन केले. माधुरी सावरकर यांनी प्रास्ताविकात विज्ञान मेळाव्याच्या फायद्याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन सुधा वासनिक यांनी केले. या मेळाव्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, लातूर अमरावती या आठ विभागातून १६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.