आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणबाधित बेरोजगारांचा महापालिकेवर मूक मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेरोजगार झालेल्या लघू व्यावसायिकांच्या वतीने 24 जुलैला महापालिकेवर मूक मोर्चा काढण्यात आला.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक तरुणांच्या हातातील व्यवसाय बंद झाला आहे. पानठेले, चहाची दुकाने आदींसह विविध व्यवसाय करणार्‍या लघू व्यावसायिकांसमोर कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने अतिक्रमणबाधित लघू व्यावसायिकांनी अतिक्रमित बेरोजगार कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ही कारवाई कठोरपणे केली जात असल्याने अनेकांना आर्थिक फटकाही बसला आहे. साहित्यासह गाड्या जमीनदोस्त केल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न या लघू व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. या वेळी मोर्चेकर्‍यांनी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांना लघू व्यावसायिकांना रोजगारासाठी जागा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले.
यांचा सहभाग
या मोर्चात संदीप जोशी, राजेश जोशी, दर्पण खंडेलवाल, अँड.सुमीत बजाज, काझी लायकअली, सागर जैन, अलिम मिर्झा, शरीकभाई, योगेश चौधरी, राजेश दिनोदिया, अरविंद पाटील, अन्सारभाई आदींसह शेकडो लघू व्यावसायिक सहभागी झाले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेरोजगार झालेल्या लघू व्यावसायिकांनी मनपावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात बेरोजगार झालेल्या अनेकांचा सहभाग होता.