आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्काउट-गाइड चळवळीत घडतात देशाचे आधारस्तंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- स्काउट गाइड चळवळीमध्ये देशाचे आधारस्तंभ घडवण्याचे सार्मथ्य असून, विश्व बंधुत्वाची शिकवण देणारी ही चळवळ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्यसंस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी केले.

मेळाव्यात विविध कार्यक्रम
मेळाव्यामध्ये शोभायात्रा, लोकनृत्य, साहसी प्रकल्प, बिनभांड्यांचा स्वयंपाक, तंबू निरीक्षण, सर्वांगसुंदर व्यायाम, शेकोटी कार्यक्रम, समूहगीत, खेळ, सर्वधर्म समभाव प्रार्थना व शारीरिक प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम राबवण्यात आले.


खिरपुरी ता. बाळापूर येथे भाऊसाहेब तिरुख विद्यालयाच्या प्रांगणावर 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या 26 व्या स्काउट गाइड जिल्हा मेळाव्याच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, बाळापूर पंचायत समितीचे सभापती निरंजन सिरसाट, जिल्हा संस्थेचे उपाध्यक्ष रामसिंग जाधव, प्राचार्य एस. आर. बाहेती, र्शीमती प्रतिभाताई जानोळकर, भाऊसाहेब तिरुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवीन तिरुख, सचिव अँड. बाळासाहेब तिरुख, सरपंच छाया जढाळ यांची उपस्थिती होती. स्काउट गाइड जिल्हा मेळाव्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध शाळांमधील 1014 स्काउट गाइड, कब बुलबुल व युनिट लिडर यांनी सहभागी होऊन आपल्या शिस्तीचे दर्शन घडवले.

मेळाव्याच्या आयोजन महत्त्वपूर्ण भूमिका केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र तिरुख व मुख्याध्यापिका कल्पना धोत्रे यांचा स्काउट गाइड जिल्हा संस्थेतर्फे धाबेकर यांनी गौरव केला. राज्य शासनाच्या वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल माजी सभापती रामसिंग जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण बाण पुरस्कार मिळवणार्‍या जिल्हा परिषद शाळा कुंभारीच्या चार विद्यार्थ्यांचा व जिल्हा मेळाव्याचे प्रमुख र्शीकृष्ण डांबलकर, आयोजन समितीचे व्ही. जी. शेंडे, राजेश पातळे, सुमन कराळे, के. टी. मानखैर, सतीश पाटीलखेडे, अल्का ठाकूर, हिंमत ढाळे, वसंत माळी, प्रमोद सिरसाट, रमेश खाडे, सविता सेवलकर, मनोज वाडकर, दत्तात्रय सोनोने, बी. एस. तायडे, रमेश जाधव, बी. बी. सानप, सोनिया सिरसाट, कल्पना शिंदे, शालिनी तायडे, सुषमा देशमुख, र्शीमती धुर्वे, मनोज बगले, पी. जे. राठोड, जे. एल. लासुरकर यांचाही गौरव करण्यात आला.

जि. प. शाळा गोरेगाव बु., ज्योती विद्यालय, अकोला, तिरुख विद्यालय खिरपुरी, जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद या शाळेतील विद्यार्थ्यांनी भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले. पंचशील विद्यालय कुरुमच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मेळाव्यामध्ये शोभायात्रा, लोकनृत्य, साहसी प्रकल्प, बिनभांड्यांचा स्वयंपाक, तंबू निरीक्षण, सर्वांगसुंदर व्यायाम, शेकोटी कार्यक्रम, समूहगीत, खेळ, सर्वधर्म समभाव प्रार्थना व शारीरिक प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम राबवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळावा प्रमुख र्शीकृष्ण डांबलकर यांनी केले. संचालन जिल्हा संघटन आयुक्त बी. बी. सानप यांनी केले. आभार सोनिया सिरसाट यांनी मानले. मेळाव्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्रफुल कचवे, डॉ. वसंतराव काळे, कर्मचारी सुधाकर साखरे, रमेश चव्हाण, सुबोध शेगावकर यांनी पर्शिम घेतले.