आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत केबल जोडणीधारकांचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अनधिकृत केबलधारकांकडून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा करमणूक कर विभागाने मोहीम हाती घेऊन अनधिकृत केबल कनेक्शन घेणार्‍यांचा शोध सुरू केला आहे.
जिल्हा करमणूक कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 29 हजार 500 केबल ऑपरेटर्स, तर डीटीएच ऑपरेटर्सची संख्या 40 हजार आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी केबल ऑपरेटर्स कार्यरत आहेत. केबल ऑपरेटर्समार्फत अधिकृत केबल कनेक्शन घ्यावे, असा नियम आहे.
मात्र, शहरातील आरोग्य कॉलनी, सिंधी कॅम्प, जठारपेठ, डाबकीरोड, अकोटफैल भागात प्रामुख्याने अनधिकृत केबलधारकांची संख्या जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा तालुक्यातही अनधिकृत केबल ग्राहकअसल्याचे सूत्रांनी सांगितले. अनधिकृत के बल कनेक्शन घेऊन हजारो ग्राहक शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडवत आहे. तालुक्याचे प्रमुख तथा तहसीलदारांच्या मार्गदर्शनात मोहीम उघडली असून, शहरातील केबल ऑपरेटर्सला सूचना दिल्या आहेत. अनधिकृतपणे कनेक्शन दिल्यास किंवा घेतल्यास दोघांविरुद्ध कारवाई होणार आहे. शहरातील केबल ऑपरेटर्सला करमणूक कर विभागाने त्या अनुषंगाने माहिती दिली आहे. थकित कराचा भरणा करून अनधिकृत कनेक्शन घेतलेल्यांचा शोध घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनदेखील जिल्हा करमणूक कर विभागाने केले आहे.
शोध घेणे सुरू
अनधिकृत केबल कनेक्शन घेतलेल्यांचा शोध सुरू आहे. याबाबत सर्व केबल ऑपरेटर्सला सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात तलाठय़ांनाही अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आदेश दिला आहे.’’ राहुल तायडे, जिल्हा करमणूक कर अधिकारी, अकोला.