आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक: बारावीत १९,३५० उत्तीर्ण तर पदवीच्या जागा फक्त ९,३०२

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- यंदा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.७० टक्के एवढा लागला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जिल्ह्यातील एकूण ६३ महाविद्यालयातील उपलब्ध जागा पाहता यंदाही अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. परिणामी, कनिष्ठ महाविद्यालयातून पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता लागली आहे.
यंदा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधून कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी अशा सर्व शाखांमिळून २० हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १० हजार ८४३ मुले, तर १० हजार ४८ मुली होत्या; यापैकी २० हजार ८७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १० हजार ८३० मुले, तर १० हजार ४३ मुली होत्या; यापैकी १९ हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची संख्या हजार ८४६ इतकी, तर मुलींची संख्या ९५०४ इतकी आहे.
उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ९०.९१, तर मुलींची टक्केवारी ९४.६३ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६३ महाविद्यालयांत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांच्या जागांची एकूण संख्या हजार ३०२ इतकी आहे. १९ हजार ३५० विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे जागांच्या उपलब्धतेनुसार १० हजारांहून अधिक मुले प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. मात्र, विद्यार्थ्यांसाठी अनेक पयार्य खुले आहेत.
हे पर्याय खुले
ज्या विद्यार्थ्यांना बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए यामध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांच्यासाठी तंत्रशिक्षण, डीटीएड, डीफार्म, बीफार्म, बीएएमएस यासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पर्याय खुले आहेत. विद्यार्थी पर्यायाचा विचार करू शकतात.
बहिःस्थ पदवीचा पर्याय
महाविद्यालयात प्रवेश घेताही परस्पर पदवी परीक्षेला बसता येते. या पद्धतीला ‘बहिःस्थ शिक्षण’ म्हणतात. परीक्षेस बसणे, पदवी मिळवणे म्हणजेच बहिःस्थ शिक्षण किंवा बहिःस्थ पदवी होय. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रवेश गुणवत्तेवरच...कल अकोल्याकडेच...