आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • See Positive Way, Change Definitely Come State Minister Ranjit Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मकतेला प्राधान्य द्या; चांगले बदल निश्चितच होतील, राज्यमंत्री रणजित पाटील यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना महाराष्ट्रातील संतानी दिली आहे. ख-या अर्थाने ही संकल्पना नसून हा सकारात्मक विचार करण्याचा संदेशच संतानी दिला आहे. त्यामुळे नकारात्मतेला बाजूला सारून सकारात्मकतेला प्राधान्य द्या, निश्चि तपणे चांगलेच होईल, असे आवा हन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजि त पाटील यांनी १ फेब्रुवा रीला दि व्य मराठी कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान झालेल्या मनमोकळ्या संवा दाच्या माध्यमातून केले. या संवा दातून डॉ. रणजि त पाटील यांनी विविध प्रश्नां ची उत्तरे देत जिल्ह्याला विकासाकडे नेण्याची ग्वा ही दिली. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न केवळ एका गावा चा नाही, राज्यातील अनेक गावांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. या साठी कुंटे समि ती नियुक्त करण्यात आली आहे. येत्या काही दिव सांत कुंटे समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. कुंटे समि तीच्या अहवा लातून हार्डशिप अँड कम्पाउंडिंगच्या माध्यमातून अवैध बांधकामाचा तिढा सोडवला जाईल. परंतु, या चा अर्थ काय द्याची ऐशीतैशी करणा-यांची गय केली जाणार नाही. कारण काय द्याचे पालन करणे हेसुद्धा प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही डॉ. रणजित पाटील म्हणाले. हे सर्व निर्णय विचाराधीन आहेत. या पैकी काहींचे प्रस्ताव तयार आहेत. काहींचे प्रस्ताव तया र करण्याचे काम सुरू आहेत. शासनाचे हे सर्व प्रयत्न सकारात्मक असून, त्यातून नि श्चि तच चांगलेच होईल, अशी अपेक्षाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केली.
शिक्षणपद्धत बदलण्याची गरज
आजच्याशिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. केवळ शाळेत नाव दाखल केल्याने निरक्षरता कमी होणार नाही, तर पुढची पिढी चांगली शिक्षण घेतलेली निर्माण करणेही गरजेचे आहे. यासाठीच आठवीपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय मागे घेऊन प्रत्येक वर्गात परीक्षा पुन्हा घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष कमी होईल. याच अनुषंगाने सिव्हिल तसेच खासगी रुग्णालये ही टीचिंग इन्स्टिट्यूट होणे गरजेचे आहे. यामुळे विकासासोबत वैद्यकीय शिक्षणातील सातत्य कायम राहील, असेही डॉ. रणजित पाटील म्हणाले.
या महत्त्वपूर्ण विषयांवर केली मनमोकळी चर्चा
पोलिस वसाहत
पोलिस वसाहतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या मुळेच चटई क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये काही प्रमाणात बदल करून पोलिस वसाहतीचा प्रश्न सोडवण्या चा शासनाचा प्रयत्न असून यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल
हद्दवाढीला प्राधान्य
महापालिका क्षेत्रालगत ग्रामपंचायत क्षेत्रातील
उपनगरांनी विळखा घातला आहे. ही उपनगरे महापालि केच्या मूलभूत सोयी-सुविधांचा उपयोग घेऊनही त्या चा मोबदला देत नाहीत. त्या मुळे महापालिकेवरील बोजा वाढला. ग्रामपंचायतीचे अधिकारही वाढवून दिले आहेत. परंतु, त्याचा फारसा उपयोग होत नाही. यासाठी हद्दवाढीला आपण प्राधान्य देणार आहे.
सीसीटीव्ही सक्ती
प्रत्येक व्यावसायिकाला दुकानाचा परवाना देताना ज्या प्रमाणे विविध बाबींची पूर्तता करावी लागते, त्याच पद्धतीने सीसीटी व्ही सक्तीचा केल्यास गुन्हेगारीला आळा बसून कायदा व सुव्यवस्था कायम राहण्या स मदत होईल.