आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चीला चपलांचा हार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पीक विम्याचे प्रीमियम बँकेने विमा कंपनीकडे जमा न केल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मंगळवारी 5 ऑगस्टला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकार्‍यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदवला. आमदार डॉ. रणजित पाटील व माजी आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या घटनेची माहिती प्रारंभी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली. दरम्यान, कार्यालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लहाळे अनुपस्थित होते.

अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांनी पीक विम्याचे पैसे बँकेकडे जमा केले. मात्र, बँकेने ही रक्कम विमा कंपनीत जमा न केल्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. केळीचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी याबाबत संताप व्यक्त केला. लहाळे यांना आजच कारणे दाखवा नोटीस देतो, असे आश्वासन सहसंचालक सरदार यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

बँक अधिकार्‍यांच्या हलगर्जीचा शेतकर्‍यांना फटका बसू नये, या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम द्या. सोयाबीन बियाण्यांची दोन-तीनदा पेरणी करूनही उगवण झाली नाही. महाबीजच्या बियाण्यांची उगवण न होण्याचे प्रमाण अधिक आहे. खरिपाचे नुकसान झाले. यापूर्वी गारपिटीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकर्‍यांना द्या, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

अकोट, पणज परिसरात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. 180 शेतकर्‍यांचे 100 टक्के नुकसान झाले. शेतकर्‍यांनी पीक विम्याच्या प्रीमियमची रक्कम स्वत:च्या खिशातून बँकेकडे जमा केली. मात्र, शेतकर्‍यांनी चौकशी केली असता बँकेने ही रक्कम विमा कंपनीत भरलीच नाही. कृषी अधीक्षकांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे. बर्‍याच भागात सोयाबीन उगवले नाही, त्याची पाहणी करा, उद्या शासनाने मदत जाहीर केली, तर आपली तयारी हवी, अशी मागणी पटेल व पाटील यांनी लावून धरली. परंतु, एसएओ लहाळे वेळ देऊनही कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला.

उपमुख्यमंत्र्यांचाच उपर्मद करण्याची हिंमत
उपमुख्यमंत्र्यांचाच उपर्मद करण्याची हिंमत अधिकारी दाखवत आहेत. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यात त्यांना रस नसेल, तर अशा अधिकार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करावी. अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक, सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकर्‍याला मदतीचा हात द्या. - पाशा पटेल, माजी आमदार.
..तर लहाळेंवर कारवाई करू
4एसएओ लहाळे यांना आजच कारणे दाखवा नोटीस देतो. सोयाबीन पिकाची पाहणी दोन दिवसांत करण्याचे निर्देश लहाळे यांना देत आहोत. निर्देशांचे पालन झाले नाही, तर कडक कारवाई करू. लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्या भावनांचा आदर झालाच पाहिजे. सरदार, कृषी सहसंचालक, अमरावती.
हा तर अधिकार्‍यांचा पळपुटेपणा
4गेल्या चार महिन्यांत तुरीचे, हरभर्‍याचे चुकारे झाले नाही. त्यावरील व्याज द्यावे. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढला आहे. हरणांचा कळप पळवून लावण्यासाठी शेतकर्‍यांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे. शेतकरी काहीच करू शकत नाही. अशावेळी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, तर ते पळपुटेपणा करत आहेत. डॉ. रणजित पाटील, आमदार.
शेतकरी झाले संतप्त
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना
पीक विम्याबाबत दिरंगाई करणार्‍या बँकांविरुद्ध फौजदारी दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोल्यातच दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाची अवहेलना होत असून, जिल्ह्यातील बँकांच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकर्‍यांच्या जीवनाशी खेळणार्‍या बँक अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी दाखल करा, उर्मटपणे वागणार्‍या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना निलंबित करा, आदी मागण्या आमदार पाटील व पाशा पटेल यांनी केल्या आहेत.
दोन तास पाहिली अधिकार्‍यांची वाट
आघाडी सरकार हाय हाय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचा निषेध असो, अशा घोषणा शेतकर्‍यांनी दिल्या. लोकप्रतिनिधींशी उर्मटपणा करणार्‍या अधिकार्‍यांचा आम्ही निषेध करतो. जवळपास दोन तास लोकप्रतिनिधी, शेतकरी लहाळे यांची वाट पाहत होते. परंतु, ते आले नाहीत.