आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self Defense Training News In Marathi, Divya Marathi

जिल्ह्यात प्रशिक्षणातून घडल्या 1,364 स्वयंसिद्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यातर्फे शासकीय माध्यमिकमधील इयत्ता नववी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम (स्वयंसिद्धा) 13 ते 21 फेब्रुवारीदरम्यान राबवला. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 1,364 स्वयंसिद्धा घडवण्यात आल्या.

क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वसंत देसाई क्रीडांगणावर 21 फेब्रुवारीला या प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या प्रशिक्षण शिबिरात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत मास्टर प्रशिक्षक म्हणून अरुण सारवान, खुशबू चोपडे व सहकार्‍यांनी युवतींना तायक्वांदो, कराटे, योगा, एरोबिक्स, लाठीकाठी आदी खेळ प्रकारांचे प्रशिक्षण देऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या मुलांच्या पटसंख्येच्या तुलनेत मुलींच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे. काही अप्रिय घटनांमुळे मुली व त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढवा, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींच्या शिक्षणाबाबत किशोरी उत्कर्ष मंच हा उपक्रम जिल्हा परिषद, नगरपालिका, शासकीय आर्शमशाळांमध्ये राबवण्यात येत आहे. माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित केली असून, त्यासाठी शासनाकडे नोंदणी असलेल्या स्वयंसिद्धा संघटनेचे प्रशिक्षित प्रशिक्षक उपलब्ध आहेत. प्रशिक्षणाचे आयोजन क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी अ. ज. सोनवणे यांनी संयुक्तपणे केले.