आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या ३४ शाळांपैकी १२ शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या रोखण्यासाठी तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करता यावी, या हेतूने आयुक्त सोमनाथ शेटे यांनी महापालिका शाळांमध्ये २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रापासून सेमी इंग्लिश तसेच केजी-१ चे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. यानुसार महापालिकेच्या ३४ शाळांपैकी १२ शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश वर्ग, तर २० शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरू करण्यात आले.

एकेकाळी महापालिका आणि जिल्हा परिषद शाळाच प्राथमिक शिक्षणासाठी उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांच्या संख्येत वाढ झाली. महापालिका शाळांपेक्षा शैक्षणिक दर्जाकडे विशेष लक्ष तसेच सुसज्ज इमारती, गणवेश, इंग्रजीचा प्रभाव यामुळे महापालिकेच्या शाळा ओस पडू लागल्या. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी संख्या घटत उर्वरित.पान
गेली.परिणामी, महापालिका शाळांची संख्याही घटली. मागील शैक्षणिक सत्रात महापालिकेच्या ५५ शाळा होत्या. आता त्या ३४ वर आल्या. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्लिश तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळेत घालावे, या हेतूने केजी-१ वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या या आदेशाची अंमलबजावणी ३४ शाळांमध्ये झाली नसली, तरी पहिल्याच वर्षी अनेक शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. महापालिका शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरू झाल्याने पुढील वर्षी या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी इंग्रजी वर्ग सुरू होतील. त्यामुळे यापुढे विद्यार्थी संख्या घटणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. तसेच ज्या शाळांमध्ये आठवीचा वर्ग नव्हता, त्या शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. एकूण १७ शाळांमध्ये आठवा वर्ग या शैक्षणिक सत्रापासून सुरू झाला आहे.

मनपा शाळेची दहावीची पहिली बॅच
महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट म्हणून गणल्या जाणारी मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये केजी-१ मागील शैक्षणिक वर्षातच सुरू करण्यात आले होते. तर, या शाळेला दहावीच्या तुकडीला मंजुरी मिळण्यासाठी नगरसेवक दिलीप देशमुख यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याने मंजुरी मिळाली होती. त्यामुळे २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात या शाळेची पहिली बॅच दहावीची परीक्षा देणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला फायदा होईल
महापालिका शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्लिश तसेच केजी-१ ची व्यवस्था नव्हती. आता ही व्यवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. दिलीप देशमुख, नगरसेवक
या शाळांमध्ये आठवा वर्ग
-मराठीमुलांची शाळा - ३, ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४, १९, २२, २६
-हिंदी शाळा क्रमांक -१
-उर्दू कन्या शाळा क्रमांक -३, ४,

क्वाॅलिटी महत्त्वाची
सेमीइंग्रजी तसेच केजी-१ सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कारण क्वाॅलिटी मिळाली तरच विद्यार्थ्यांना खरा फायदा होईल.'' डॉ.गजानन नारे

गुणवत्ता वाढवू
विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठीच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यापुढे महापालिका शाळांची गुणवत्ता कशी वाढेल, यावर लक्ष दिले जाणार आहे.'' सोमनाथशेटे, आयुक्त

या शाळांमध्ये केजी-१
-मराठीमुलांची शाळा क्रमांक ४, ९, १६, १७, १८, २२, २६
-हिंदी शाळा क्रमांक -१,
-उर्दू शाळा क्रमांक -१, ६, ७, ८, ९, १०, १२
-उर्दू कन्या शाळा क्रमांक -१, ३, ४,

सेमी इंग्लिश वर्ग

-मराठीमुलांची शाळा क्रमांक - १, ४, ७, १६, १७, २२, २६
-हिंदी शाळा क्रमांक - उर्दू शाळा क्रमांक-६, ८, ९, १०
बातम्या आणखी आहेत...