आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Semi English Syllabus In Municipal Corporation School

आता मनपा शाळांमध्येही केजीसह सेमी इंग्लिश वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - क्षीण झालेल्या महापालिका शाळांच्या शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी, तसेच पालकांनी पुन्हा आपल्या पाल्यांना महापालिका शाळांमध्ये घाला, या हेतूने आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी महापालिकांच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शाळेसह (केजी-१) सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५-२०१६ या शैक्षणिक क्षेत्रातच हे वर्ग सुरू केले जाणार असल्याने सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षणाबाबत आज पालक जागरूक झाले आहेत. कामगार असो की अधिकारी, प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, इंग्रजीचे ज्ञान त्याला पहिल्या वर्गापासूनच मिळावे, असे वाटते. यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही पालक पोटाला चिमटा लावून आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतात. जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा शाळांमध्येही व्यवस्था नसल्याने तसेच प्रशासनाने शाळांकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा प्रचंड प्रमाणात घसरला आहे. एकीकडे शैक्षणिक दर्जा घसरलेला असताना दुसरीकडे शाळा इमारतींची खस्ता हालत, सोयी-सुविधांचा अभाव याचीही भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. महापालिकेच्याच १३ वर्षांत ७३ पैकी ४१ शाळा बंद पडल्या आहेत, तर विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत चालली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला शिक्षकांच्या वेतनावरच अधिक खर्च करावा लागत आहे.

चालू शैक्षणिक वर्षातही महापालिकांच्या शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊनच आयुक्त सोमनाथ शेट्ये यांनी यापुढे महापालिका शाळांमध्ये घट होऊ नये, सर्वसामान्य पालकांचा महापालिका शाळेकडे पुन्हा ओढा वाढावा, ही बाब लक्षात घेऊन चालू शैक्षणिक सत्रापासून महापालिका शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, इयत्ता पाचवीपासून मराठी सेमी इंग्रजी अशा दोन तुकड्या सुरू करण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली आहे.

सेमी इंग्रजी : महापालिकाशाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी, या हेतूने महापालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तोडगाही आयुक्तांचा
पटसंख्येच्यानावाखाली सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा बहाणा करू नये, यासाठी आयुक्तांनी मुख्याध्यापकांना तोडगाही सुचवला आहे. पाचवीची पटसंख्या कमी असेल, त्या शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यासाठी त्याच भागातील अधिक ठरणार्‍या विद्यार्थ्यांना दाखला देऊन सेमी इंग्रजी वर्ग सुरू करावा, अशी सूचनाही केली आहे.

दाखला वितरित करू नये : पाचवीते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये पात्र पटसंख्या असेल त्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखला वितरित करू नये. पात्र पटसंख्येमुळे या शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू करण्याच्या सूचनाही केल्या आहे.

दर्जा सुधारणार
मनपा शाळांचा घसरलेला शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. महापालिका शाळांमध्येही केजी-१ तसेच सेमी इंग्रजी वर्ग सुरू करता येतो, ही बाब महापालिका शाळा क्रमांक २६ ने सिद्धही केली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.'' सोमनाथशेट्ये, आयुक्त मनपा.

केजी-१ सुरू
पहिलीत विद्यार्थी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांची दाखल संख्या अधिक दर्शवली जाते. प्रत्यक्षात पटावर हजर असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी असते. ही बाब लक्षात घेऊनच केजी-१, केजी-२ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.