आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सर्व निवडणुका शिवसेना पूर्ण शक्तीनिशी लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - बुलडाणा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उघड गटबाजीचे प्रदर्शन झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत पातळीवर नेत्यांना शिवसेनेचे उपनेते सुहास सामंत यांनी कानपिचक्या दिल्यानंतर तब्बल १९ दिवसांनी पुन्हा त्यांनी शेगाव येथे शिवसेनेच्या आजी, माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

दरम्यान, १८ फेब्रुवारीला शेगाव येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेना पक्ष येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे शिवसेना नेते सुहास सामंत यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार डाॅ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, धीरज लिंगाडे अन्य उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षसंघटन मजबुतीसाठी राज्यात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत शेगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. शिवसेना पक्ष हा कॅडरबेस पक्ष असून, आगामी काळात येणाऱ्या निवडणुकामध्ये पक्षाला भरघोस यश मिळावे, यासाठी पक्ष संघटन मजबुतीवर सध्या भर दिला जात आहे.

दरम्यान, मागील काळांमध्ये शिवसेनेमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत वाद पाहता आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून शिवसंपर्क अभियान जोमाने राबवावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी केले. गट- तट विसरून पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले तर कार्यकर्ते धडाडीने शिवसेनेला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवतील, असे ते म्हणाले.

फेरबदलाचे दिले संकेत

प्रारंभीशिवसेनेच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता त्यानंतर दुपारी बैठक घेण्यात आली. पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.
सोबतच त्यानुषंगाने जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर काही ठिकाणी फेरबदल करण्याचे संकेत त्यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा येथे ३१ जानेवारीला झालेल्या आणि अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुहास सामंत यांचे हे वक्तव्य अनेक अर्थाने सूचक म्हणावे लागले.
फोटो - शेगाव येथे शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित उपनेते सुहास सामंत, खासदार प्रतापराव जाधव आदी.