आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ऑगस्टपासून ‘शासन आपल्या दारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - येत्या 1 ऑगस्टपासून ‘शासन आपल्या दारी’ ही राज्य शासनाची अभिनव योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. लोकाभिमुख प्रशासन अशी ओळख झाली पाहिजे, त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हय़ातील नागरिकांना, कर्मचार्‍याला आणि विद्यार्थी वर्गाला कोणतेही दाखले लागल्यास आता घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हय़ात 629 प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहेत. या विद्यालयांची विद्यार्थीसंख्या लक्षात घेतल्यास 60 हजारांच्यावर आहे. आता विद्यार्थी वर्गाची काळजी घेतली असून, यानंतर थेट सेतू केंद्र विद्यालयात अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अरुण शिंदे म्हणाले.

जिल्हय़ात चावडी वाचन कार्यक्रम 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. यामध्ये सातबारा, भूसंपादन, वैयक्तिक, सामूहिक आणि राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. अकोला जिल्हय़ातील ग्रामीण भागातील पाणंद रस्ते आणि गावातील अतिक्रमण लोकसहभागातून काढण्यात येणार आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले.